चैन स्नॅचिंग प्रकरणी ईराणी टोळीच्या सदस्यास ताब्यात घेऊन दोन गुन्हे उघड केले,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

मकरसंक्रातीच्या दिवशी बोरगाव मंजु व मुर्तीजापुर शहर येथे चैन स्नॅचींग करणा-या इराणी टोळीतील अटटल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन आरोपी कडुन एकुण ३,०४,९००/-रू चा मुददेमाल केला हस्तगत….

अकोला(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.१५ जानेवारी २०२५ रोजी पोलिस स्टेशन मुर्तीजापुर शहर व बोरगाव मंजु हददीतील वेगवेगळया ठिकाणी महीलांच्या गळयातील सोन साखळी जबरीने तोडुन हिसकावुन अज्ञात मोटर सायकलस्वार धुमाकुळ करून पळून गेले होते त्या बाबत पो स्टे बोरगाव मंजु व मुर्तीजापुर शहर येथे अज्ञाताविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले होते.सदरील घटनेमुळे महीलावर्गा मध्ये दहशत निर्माण झाली होती त्यामुळे नमुद गुन्हयांची गंभीरता लक्षात घेता पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांनी सदर गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलिस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशीत करून योग्य सुचना दिल्या





नमुद दोन्ही गुन्हयात पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील एक पथक तयार करून त्यांना सदर गुन्हा उघडकीस आणणे बाबत योग्य मार्गदर्शन व सुचना दिल्या त्या अनुषंगाने नमुद पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक विश्लेषण व गोपनिय माहीती काढली असता सदरचा गुन्हा हे भुसावळ येथील सराईत इराणी टोळीतील गुन्हेगार यांनी केल्याचे निष्पन्न झाले होते त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी एक पथक भुसावळ येथे आरोपी शोध कामी पाठविले असता सदर पथक एकुण ०५ दिवस भुसावळ येथे मुक्कामी राहुन आरोपींचा शोध घेतला परंतु आरोपी हे भोपाळ येथे फरार झाल्याचे समजल्याने त्यांना पकडु शकले नाही.



तसेच अमरावती शहर येथील गुन्हे शाखा युनीट २ यांनी आरोपी  हसन अली उर्फ अश्शु नियाझ अली वय २० वर्षे रा. पापा नगर, रजा टॉवर जवळ, भुसावळ यास अटक केल्या बाबत माहीती प्राप्त झाल्याने सदरील आरोपीस तपास कामी त्यांचे ताब्यातुन घेवुन पो स्टे बोरगाव मंजू अपराध कं. १५/२०२५ कलम ३०४ (१), ३ (५) भा न्या सं मध्ये अटक करून विश्वासत घेवुन गुन्हयां बाबत विचारपुस केली असता त्याने पो स्टे बोरगाव मंजु व मुर्तीजापुर येथील गुन्हे त्याचे साथीदार  मुस्तफा इसा अली, हसनैन जाफर अली, महू जाफर अली यांचेसह पल्सर मोटर सायकल व अपाची मोटर सायकलने केल्याचे कबुली दिली तसेच नमुद दोन्ही गुन्हयात चोरी करून लपुन ठेवलेला मुददेमाल हा त्याचे राहते घरी पापानगर भुसावळ येथे जावुन जप्त करण्यात आला. त्याचे कडुने पो स्टे बोरगाव मंजू अपराध कं. १५/२०२५ कलम ३०४ (१), ३ (५) भा न्या सं मध्ये फिर्यादी हीचे गळयातील सोन्याची पटटा पोत १३ ग्रॅम चालु बाजार भावाप्रमाणे किं. १,१८,३५०/- रू व पो स्टे मुर्तीजापुर शहर येथील किराणा दुकानातील महीलेच्या गळयातील अंदाजे १२.९५० ग्रॅम चालु बाजार भावानुसार किंमत १,१६,५५०/- असा एकुण २,३४,९००/-रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने व एक पल्सर मोटर सायकल किंमत अंदाजे ७०,०००/- असा एकुण ३,०४,९००/- चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे  यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा,सपोनि विजय चव्हाण, पोउपनि, गोपाल जाधव, पोउपनि माजीदखान पठाण सोबत पोहवा अब्दुल माजीद, रविंद्र खंडारे, वसीमोददीन, महेंद्र मलीये, अविनाश पाचपोर, भास्कर धोत्रे, पोकॉ अमोल दिपके, अशोक सोनोने व चालक पोहवा प्रशांत कमलाकर यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!