
शेतकर्यांचे धान्य तसेच शासकिय साहीत्य चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..
धान्याची शेतातून चोरी तसेच ईतर गोडावून मध्ये चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले २२ लक्ष रु च्या मुद्देमालासह केले जेरबंद, जिल्हयातील व जिल्ह्याबाहेरील एकुण ०६ गुन्हे केले उघड….
https://www.instagram.com/reel/DDZ3N80oxdz/?igsh=MXBhOXBzMGxkZTI5eg==


अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हयात मागिल काही दिवसांपासून शेतकर्यांचे शेतात असलेल्या गोडावून तसेच घरातील आवारातून अज्ञात चोरटे सोयाबीन किंवा अन्य धान्याने भरलेले पोत्यांची चोरी करीत होते. सदर चोरट्यांचा छडा लावण्याबाबत पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे चे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांना आदेशीत केले होते

त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी त्याचे अधिनस्त अधिकारी आणि अमंलदार यांना मार्गदर्शक सुचना देवून सदर सोयाबीन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्या बाबत सुचना करून एक पथक नेमण्यात आले पथकास त्याचे गोपनिय बातमीदाराने दिलेल्या माहीतीच्या आधारे पथकाने भगत वाडी येथील भंगार दुकान चालक शेख निसार शेख इद्रिस हबीब नगर, खैर मोहम्मद प्लॉट अकोला. यास व त्याचा सहकारी फारूक खान आसिफ खान रा. तारफैल गाजीया मस्जीद मागे अकोला याना निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेवून मिळालेल्या माहीतीच्या अनुषंगाने विचापूस केली असता सदर आरोपींनी अकोला जिल्हयातील बाळापूर, पातुर, जुने शहर, आणि बार्शिटाकळी हद्दीतील शेतक-यांचे सोयाबीन तसेच अकोट ग्रामीण हद्दीतुन पाणीपुरवठा विभागाच्या गोडावुन मधील साहीत्य चोरल्याची कबुली दिली.

त्याचप्रमाणे त्यांनी पुलगाव जि. वर्धा हद्दीतुन रेल्वेचे कॉपर केबल सुध्दा चोरी केल्या बाबत कबुली दिली असून त्यामध्ये १) पो. स्टे अकोट ग्रामीण अप नं ५२४/२४ कलम ३३४ (१),३०५ (३) भा.न्या. सं २) पो.स्टे पातुर अप नं ५५९/२४ कलम ३३४ (१),३०५ (३) भा. न्या. सं ३) पो. स्टे बाळापूर अप नं ९७/२४ कलम ३७९ भा.दं.वि ४) पो. स्टे बार्शिटाकळी अप नं ५७६/२४ कलम ३०३(२) भा. न्या. सं ५) पो. स्टे जुने शहर अप नं ६४५/२४ कलम ३०३(२), ३ (५) भा. न्या. सं चे असे ५ गुन्हे उघकीस आले असून आरोपींपासून सदर पाचही गुन्हयात एकुण १२,४१,८००/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच उर्वरीत ०३ आरोपी हे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.
तसेच यातील अटक आरोपींना पुढील तपास कामी पो. स्टे अकोट ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आले आहे. तसचे आरोपींनी पुलगाव जि. वर्धा हद्दीतील रेल्वे विभागाचे चोरलेले कॉपर केबल वजन अंदाचे ३ टन कि अं १०,००,०००/-रू चे सुध्दा जप्त करण्यात आले असून सदर केबल चोरी बाबत संबधीत विभागाशी संपर्क झाला असून ते पुढील तपास कामी त्याचे कडे वर्ग करण्यात येत आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे,पोलिस निरिक्षक.शंकर शेळके स्थागुशा अकोला, यांचे मार्गदर्शनात सपोनि. विजय चव्हाण, पोउपनि गोपाल जाधव, माजीदखान पठाण, पो. अमंलदार अब्दुल माजीद, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, वसीमोद्दीन शेख, अविनाश पाचपोर, भिमराव दिपके, अशोक सोनोने, तसेच चालक अक्षय बोबडे यांनी केली आहे.


