
कत्तलीकरीता केरळ येथे जाणार्या म्हशीच्या ५५ रेडके व वगारींची गुन्हे शाखेने केली सुटका…
कत्तलीकरीता म्हशीचे रेडे व वगारी उत्तरप्रदेश येथुन केरळ येथे जाणार्या १० चाकी कंटेनर वर नाकाबंदी करुन जनावरांना दिले जिवनदान…


अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हात मोठ्या प्रमाणात गोवंश जातीचे जनावरे वाहतुक करून कत्तली करीता घेवुन जाण्याचे प्रमाण वाढत असल्याने पोलिस अधिक्षक यांनी आदेशित करून त्यास प्रतींबंध करणे बाबत सुचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे चे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी गोवंश कार्यवाही करीता पथक स्थापन केले.

त्याअनुषंगाने सदर पथक आज दि ३१/१२/२०२४ रोजी पोलिस स्टेशन बाळापुर हद्दीत राष्ट्रीय महामार्ग ५३ वर पेट्रोलिंग करीत असतांना पथकास गोपनीय बातमीदाराकडुन माहीती मिळाली की महामार्गावरुन जनावरांची कत्तलीकरीता वाहतुक होणार आहे सदर माहीतीच्या अनुषंगाने बाळापुर हद्दीत तपे हनुमान मंदीरासमोर नाकाबंदी करून कत्तली करीता रेडे व वगारी हरीयाणा येथुन केरळ येथे घेवुन जाणारा कंटेनर पकडुन त्या मध्ये ५५ रेडे व वगारी की ६,२०,०००/- रू तसेच वाहतुकी करीता वारपरण्यात आलेला कंटेनर (१० चाकी) किंमत ४०,००,०००/- रू असा एकुण ४६,२०,०००/- मुददेमाल हस्तगत करून आरोपी १) मोहम्मद सोराब ईसा, वय २४ वर्ष, रा. हिम्मत पत्ती रिठड रिथात २८ मेवात राज्य हरीयाणा २) गुलाब शौकत कुरेशी वय ४३ वर्ष रा.HN ३०, मौलाना बिलाल मदरसा जवळ, मुगल पुरा-१, बागपथ, राज्य उत्तर प्रदेश ३) शमुन ईसा खान वय २४ वर्ष रा. हिम्मत पत्ती रिठड रिथात २८ मेवात राज्य हरीयाणा ४) मोमीन यासीन वय २७ वर्ष रा. पुराणा कसबा, मोहल्ला केती पुरा, बागपत उत्तर प्रदेश ५) यासीन शकील खान वय ३० वर्ष रा. सटन गला तहसील मोंढा पांडा जि. मुरादाबाद उत्तर प्रदेश यांना पुढील तपास कामी पो स्टे बाळापुर यांचे ताब्यात देण्यात आले तसेच नमुद जनावरे हयांना पुढील संगोपणा करीता आदर्श गौशाळा म्हैसपुर, अकोला येथे ठेवण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक बच्चनसिंह, अपर पोलिस अधिक्षक, अभय डोंगरे, यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा, सपोनि विजय चव्हाण, पोउपनि माजिद पठाण, पोलीस अंमलदार महेंद्र मलिये, वसिमोद्दीन, रवि खंडारे, अब्दुल माजिद, खुशाल नेमाडे, अमोल दिपके चालक प्रशांत कमलाकर मनिष ठाकरे यांनी केली.


