
लग्न सोहळ्यात चोरी करणार्या मध्यप्रदेशातील चोरट्यांचे घरुन स्थानिक गुन्हे शाखेने अकोला येथुन चोरलेले दागीणे केले हस्तगत….
स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीस नजीकच्या राज्यातुन ताब्यात घेऊन लग्न समारंभातील चोरीचा गुन्हा केला उघड, ५ लाख रु चा मुद्देमाल केला हस्तगत…..
अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १२ जुन रोजी राहुल सुरेश खेळकर वय ३९ वर्ष रा. गांधी नगर मलकापुर जि. बुलढाणा यांनीन पो स्टे जुनेशहर येथे तक्रार दिली की ते दि. ११/०६/२०२५ रोजी त्यांची वहीनी प्रतीभा रविद्र सुरंगे वय ५० वर्ष रा सुदंर नगर भुसावळ जि. जळगाव यांची मुलगी कु शामल हीचा लग्न सोहळा असल्याने दुपारी ०३:०० वा होटेल हेरीटेज येथे थांबले होते


दि. १२/०६/२५ रोजी दुपारी १२.२५ वाजता लग्न लावण्या करीता त्यांची सौ प्रतीभा हेी स्टेज वर गेली असता त्यांनी त्यांचे हातातील असलेली पर्स हे नवरदेवच्या मागे ठेवली व लग्न लावल्या नंतर पर्स घेण्या करीता गेले असता पर्स दिसुन आली नाही या वरून आजु बाजुला पाहणी केली तसेच नातेवाईकांना विचारपुस केली असता एका लहान मूलीने सांगीतले की तुमची पर्स एका मुलाने उचलुन नेली आहे सदर पर्स मध्ये ५० ग्राम वजनाचे एक सोन्याची पोत एक जिओ कंपणीचा मोबाईल व एक १ ग्रम सोन्याची नथ व चार चाकी वाहनाची चाबी तसेच नगदी पैसे असा मुददेमाल चोरीला गेला

अश्या तक्रारीवरुन राहुल सुरेश खेळकर पो. स्टे जुनेशहर अकोला येथे अप क ४२१/२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहीता प्रमाणे गुन्हा नोंद केला व तपास सुरु होता सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे बाबत पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा शंकर शेळके यांना व त्यांचे पथकास आरोपीचा तात्काळ शोध घेण्या बाबत आदेशीत केले. त्यावरून पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी आरोपीचा शोध घेणे करीता वेगवेगळी पथके तयार करून तपास कामी रवाना केले.

सदर पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी पोलिस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाच्या आरोपीचा शोध घेण्या समांतर तपास करून तांत्रीक विश्लेषन व गुप्त बातमीदार यांचे कडुन माहीती प्राप्त केली असता सदर गुन्हा हे ग्राम कडीया सांसी जि राजगड मध्य प्रदेश येथील १) करण पीता पप्पु सिसोदीया २) मानव नोजल सिसोदीया यांनी केल्याचे निष्पन्न झाले याचे बाबत माहीती घेवुन नमुद आरोपीचे घरी जावुन त्यांचा शोध घेतला असता ते मिळुन आले नाही वरून त्यांचे घराची झडती घेतली असता त्याचे घरात गुन्हयातील चोरी गेलेली ५० ग्राम वजनाचे एक सोन्याची पोत की ५,००,०००/- रू चा मुददेमाल मिळुन आल्याने सदर मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अर्चित चांडक, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा,. सहा. पोलिस निरीक्षक विजय चव्हाण, पोउपनि, गोपाल जाधव, पो. हवा. वसीमोद्दीन, अब्दुल माजीद अ. सादीक, रविद्र खंडारे, महेद्र मलीये, चालक पो. हवा. प्रशांत कमलाकर यांनी केली.


