
विक्रीकरीता जाणारे गोमांस खदान पोलिसांनी नाकाबंदी करुन घेतले ताब्यात…
विक्रीकरीता जाणारे गोवंशीय मांस खदान पोलिसांनी केले जप्त,वाहनासह २,१२०००/- मुद्देमाल जप्त….
अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नुतन पोलिस अधीक्षक बच्चन सिंग , अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांनी अकोला जिल्हयातील सर्व पोलिस स्टेशन हददीत अवैधरित्या चालणारे सर्व बेकायदेशीर धंदयाचे समुळ उच्चाटन करणाच्या तसेच अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करून अवैध धंद्यांवर अंकुश व आळा घालण्या करीता धाड कारवाई करण्याच्या निर्देश सूचना सर्व पोलिस स्टेशन प्रभारी यांना देण्यात आल्या होत्या .या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध धंदयाविरुध्द धाड मोहीम राबविण्यात येत होती त्यानुसार दिनांक १४/१/२०२३ रोजी पोलिस स्टेशन, खदान येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाला गुप्त माहिती मिळाली एक इसम एका काळ्या पिवळ्या रंगाच्या ऑटो मधे गोवंशीय मांस घेऊन जात असल्याचे माहीतीवरुन पोलिसांनी सकाळी ८. वा चे दरम्यान खडकी पुलाजवळ नाकाबंदी केली असता मिळालेल्या माहीतीनुसार वर्णनाचा ॲाटो क्रमांक MH 30-P/9358 येतांना दिसला त्यास थांबवुन त्याची तपासनी केली असता त्याच्या मागील डाल्यात गोवंशीय मांस आढळुन आले त्या ॲाटोच्या चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव


रेहान अहमद अब्दुल राऊत वय 32 वर्ष राहणार बार्शीटाकळी जामा मस्जिद जिल्हा अकोला

असे सांगितले व सदर गोमांस विक्रीकरीता घेऊन जात असल्याचे सांगितले वरुन सदर आरोपीविरुध्द पोलिस स्टेशन खदान येथे अप.नं.120/24 क.5 ब 9 अ प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्याचे ताब्यातुन ३५० किलो गोमांस व वाहतुकीसाठी वापरलेला ॲाटो असा एकुन २,१२०००/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला व त्यातील चाचनीसाठी गोमांसाचे नमुने घेऊन सदर आरोपीस व गोमांस व ॲाटो ताब्यात घेऊन सदरचे गोंमास हे महानगपालिकेचे कचरा यार्डमधे खड्डा करुन नष्ट करण्यात आले

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक बच्चन सिंग,अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे,उपविभागिय पोलिस अधिकारी अकोला सुभाष दुधगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक धनंजय सायरे, पोलिस स्टेशन खदान यांचे आदेशाने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस हवालदार संजय वानखेडे ,मनोज दुबे,गणेश दुबे,निलेश चव्हान यांनी केली


