अकोला रामदासपेठ पोलिसांनी काही तासाचे आत केला दुहेरी खुनाचा उलगडा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

एकाच रात्री घडलेल्या दोन हत्याकांड प्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी काही तासाचे आत आरोपींना अटक करुन दोन्ही गुन्हे  केले उघड….

अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि.(१८)रोजी १२.५५ वा. दरम्यान जैन कटलरीच्या समोर गुजराती स्विट रेल्वे स्टेशन अकोला येथे तीन अज्ञात इसमांनी  अतुल लक्ष्मण थोरात वय ३० वर्ष रा. अशोक नगर, अकोट फैल अकोला यांना शुल्लक कारणावरुन धारधार चाकुने पोटात व मानेवर वार करुन जख्मी केले उपचारा दरम्याण जखमीचा मृत्यु झाला





अश्या फिर्यादी नामे शैलेश मधुकर वाघमारे वय ३२ वर्ष रा. अशोक नगर अकोला यांचे जबानी रीपोर्ट वरून पो.स्टे. रामदासपेठ येथे अप. न. १६६/ २४ कलम ३०२,३४ भादवी चा गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच घटणास्थळ वर हजर असतांना रामदासपेठ
पोलिसांना माहीती मिळाली की,  रात्री ०१/३० वा. चे सुमारास येथे जुन्या वादाचे कारणावरुन तीन इसमांनी  राज संजय गायकवाड वय १९ वर्ष रा. बजरंग चौक, विजय नगर अकोला यांना धारधार चाकुने पोटात व मानेवर वार करून जख्मी केले सदर जख्मी याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला फिर्यादी नामे ऋषीकेश संजय गायकवाड वय २३ वर्ष रा विजय नगर अकोला यांचे फिर्यादी वरून पो स्टे ला अप न १६७/२४ कलम ३०२, ३४ भादवि चा गुन्हा दाखल झाला.
सदर गुन्हयाचे तपासात  तपास पथकाने सदर घटनास्थळाची सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारचे माहिती वरून आरोपी नामे १)मनिष शरद भाकरे वय २१ वर्ष, २) ऋषीकेश दिपक आपोतीकर वय २० वर्ष दोन्ही रा. देशमुख फैल अकोला व एक विधी संघर्षीत बालक रा. माता नगर यांना सदर गुन्हे प्रकरणात चौकशी कामी विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी जैन कटलरीच्या समोर गुजराती स्वीट रेल्वे स्टेशन अकोला येथे अतुल लक्ष्मण थोरात यांची हत्या केल्याची तसेच विजय नगर येथील राज संजय गायकवाड अकोला यांची आम्ही तिन मित्रांनी मिळुन एकाच रात्री दोन खुन केल्याची कबुली दिली वरून एकाच रात्री घटलेल्या दोन्ही खुनाचे गुन्हे काही तासाचे आत उघडीस आणुन आरोपींना अटक केली
सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक बच्चन सिंग,अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे,उपविभागिय पोलिस अधिकारी,अकोला
सतिष कुलकर्णी,पोलिस निरीक्षक मनोज बहुरे यांचे मार्गर्शनाखाली सपोनि के. डी. पवार, महिला पोलिस उपनिरीक्षक मिरा सोनुने, सफौ सदाशिव सुळकर, पोहवा शेख हसन शेख अब्दुल्ला, पोहवा किरण गवई, पोशि श्याम मोहळे, अनिल धनभर, संदिप वानखडे, म.पोशि पुजा यंदे सर्व नेमणुक रामदापेठ, अकोला यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!