अकोला: ‘मोहता मिल’ परिसरातील जबरी चोरीचा ४८ तासांत उलगडा; एलसीबीकडून ३३.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त, मुख्य आरोपी अटकेत

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अकोला येथील ‘मोहता मिल’ परिसरातील जबरी चोरी प्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या ४८ तासांत अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरी गेलेला ३३,६२,१५५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

घटनेचा पार्श्वभूमी व गुन्हा



दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी विजयकुमार रामकरणदास गुप्ता (वय ६७ वर्षे, रा. चिरणिया कम्पाऊंडसमोर, मोहता मिल रोड, अकोला) यांनी तक्रार दिली होती. ते घरातील ढेपेच्या गोदामात काम करत असताना आरोपींनी आत प्रवेश केला. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली आणि त्यांचे हात-पाय बांधून ठेवले. त्यानंतर कपाटातील २२४ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ४,५०,०00 रुपये रोख, असा सुमारे २६,५०,००० रुपयांचा मुद्देमाल लुटून आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस तपास व आरोपी निष्पन्न



अकोला पोलीस अधीक्षक :- अर्चित चांडक यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे  पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी तीन विशेष पथके तयार केली.

  • सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषण: पथकांनी अकोला शहर व परिसरातील ११० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले.



  • संशयित कामगार: तपासादरम्यान फिर्यादींच्या दुकानात गेल्या ४ वर्षांपासून काम करणाऱ्या सलीमखान गुलखान (रा. मुझफ्फर नगर, नया बैदपुरा, अकोला) याच्या हालचाली संशयास्पद आढळल्या.

  • अटक व कबुली: पोलिसांनी सलीमखानला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने त्याचा सहकारी मोहम्मद रफीक मोहम्मद हमजा (उर्फ राजा उर्फ गंगा) आणि एका अज्ञात साथीदारासोबत मिळून हा कट रचल्याची कबुली दिली.



हैदराबाद येथून आरोपीला अटक व मुद्देमाल जप्त मुख्य आरोपी मोहम्मद रफीक हा मुद्देमालासह हैदराबाद (तेलंगणा) येथे पळाल्याची माहिती मिळताच, पो.उ.नि. अनिल चव्हाण यांचे पथक हैदराबादला रवाना झाले. पथकाने हैदराबादमधील लॉजेसची तपासणी करून एका लॉजमध्ये लपलेल्या मोहम्मद रफीक मोहम्मद हमजा याला छापा टाकून अटक केली.

जप्त केलेला मुद्देमाल

  • पिवळ्या धातूचे (सोन्याचे) दागिने: सुमारे २०८.९३७ ग्रॅम

  • रोख रक्कम: २,२८,१०० रुपये

  • एकूण जप्त मुद्देमाल: ३३,६२,१५५ रुपये

सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. नितीन लेव्हरकर, सपोनि गोपाल जाधव, पो.उ.नि. अनिल चव्हाण आणि एलसीबी अकोलाच्या पथकाने केली आहे. या प्रकरणातील उर्वरित पसार अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!