अट्टल घरफोड्या स्पायडर गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात,शहरातील ५ घरफोडीची कबुली…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

घरफोडीतील कुख्यात अट्टल गुन्हेगार गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात,घरफोडीचे  ५ गुन्हे उघड…

अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दिनांक १४/०१/२०२४ रोजी फिर्यादी रामेश्वर देवीलाल उपाध्याय, रा. जवाहर गेट अमरावती यांनी फिर्याद दिली की, त्यांच्या मालकीचे उपाध्याय डायफूडस या दुकानामध्ये कोणीतरी अज्ञात चोराने रात्रीचे दरम्यान दुकानाची लोखंडी ग्रील तोडून दुकानात प्रवेश करून दुकानाच्या गल्ल्यातील नगदी ३५,००० /- रू व सिसिटीव्ही चा डीव्हीआर असा एकूण ३८,०००/- रू चा मुददेमाल चोरून नेला, अशा फिर्यादीवरून पो.स्टे. खोलापुरीगेट येथे अप.क्र. १५/२०२४ कलम ४६१,३८० भादवि चा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक सिमा दाताळकर, गुन्हे शाखा युनिट २  यानी घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणण्याचे निर्देशित केल्यावरून सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना गुप्त माहिती प्राप्त झाली की, सदरचा गुन्हा हा कुख्यात अट्टल गुन्हेगार राम उर्फ स्पायडरमॅन दिनेश मडावी याने केला आहे. अशा माहितीवरून गुन्हे शाखा, युनिट-२ यांनी अथक परिश्रम घेवून व गोपनिय माहिती काढून आरोपी नामे राम उर्फ स्पायडरमॅन दिनेश मडावी, वय ३४, रा. ग्राम सलाई, ता. काटोल, जि. नागपुर यास ताब्यात घेवून पोलिस
कस्टडी घेण्यात आली. त्याने सदर गुन्हयाची कबूली दिली त्यास विश्वासात घेवून इतर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने अमरावती शहरातील इतर ४ गुन्हयाची कबुली दिल्याने गुन्हयातील मुददेमाल जप्त करण्यात आला. आरोपी राम उर्फ स्पायडरमॅन दिनेश मडावी रा. सलाई, ता. काटोल, जि. नागपुर यास ताब्यात घेवून खालील प्रमाणे गुन्हे उघडकिस आले.
१) पो.स्टे. खोलापुरीगेट अप क्र. १५/२०२४ कलम ४६१,३८० भादवि,
२) पो.स्टे. खोलापुरीगेट अप क्र. ११/२०२४ कलम ३७९ भादवि,
३) पो.स्टे. गाडगेनगर अप.क्र. १५७/२०२४ कलम ३७९,  ४५४ ,४५७ ,५११ भादवि,
४) पो.स्टे. बडनेरा अप. क्र. ६१/२०२४ कलम ४५७,३८० भादवि,
५) पो.स्टे. बडनेरा अप. क्र. ६५/२०२४ कलम ४६१,३८० भादवि,
सदर आरोपी हा विदर्भामध्ये स्पायडरमॅन म्हणून कुप्रसिध्द असून त्याने आतापर्यंत जवळपास १०० पेक्षा जास्त घरफोडी व चोरीचे गुन्हे केले आहेत. तसेच सदर आरोपीचा वर्धा, नागपुर शहर, नागपुर ग्रामीण, अमरावती पोलीस ब-याच दिवसापासून त्याचा शोध घेत होते. त्यास अटक केल्यामुळे मोठ्या प्रमाणात घरफोडी व चोरीच्या गुन्हयाना प्रतिबंध करणे शक्य झाले आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त  नवीनचंद्र रेड्डी साहेब, पोलिस उपायुक्त सागर पाटील, पोलिस उपायुक्त  गणेश शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा  शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक श्रीमती सिमा दाताळकर यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले, पोउपनि संजय वानखडे, सहा. पोउपनि राजु काळे, पोहवा जावेद अहमद, दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, एजाज शहा, नापोशि संग्राम भोजने, मंगेश शिंदे, नईम बेग, पोशि चेतन कराडे, राजीक रायलीवाले, योगेश पवार, निलेश वंजारी चालक पोहवा संदीप खंडारे यांचे पथकाने केली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!