
गुन्हे शाखा युनीट २ चा लॅाटरी सेंटरवरील चक्री जुगारावर छापा,२५ जुगारींना घेतले ताब्यात…
अमरावती शहरातील मध्यवर्ती राजकमल चौकात अवैधरित्या चालना-या लोटो चक्री ऑनलाईन जुगार खेळविणार्या दुकानावर गुन्हे शाखा युनिट २ ची धडक कार्यवाही…
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त अमरावती शहर अरविंद चावरीया यांनी गुन्हे शाखेतील पथकाची विशेष बैठक घेवुन शहरात चालणा-या अवैध्य धंदया विरोधात प्रभावी मोहिम राबविन्या बाबत आदेशित केले होते.


त्या अनुषंगाने दि २० जुन २०२५ रोजी गुन्हे शाखा युनीट २ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, राजकमल चौक येथील सितारामबाबा मार्केट येथे काही ऑन लाईन लॉटरी सेंटरमध्ये फन टारगेट, प्ले लकी, गोल्डन चान्स या ऑनलाईन वेब साईटवर प्रतिबंधीत असलेला चक्री, घोडा या ऑन लाईन खेळावर पैसे लावुन जुगार सुरू आहे. याबाबत पोलिस निरीक्षक संदीप चव्हान यांनी लागलीच पोलिस आयुक्त यांना माहीती देवुन सहा. पोलिस आयुक्त गुन्हे शाखा यांची परवानगी घेवुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण सह गुन्हे शाखा युनिट २ वे पथक व दोन पंच असे मिळालेल्या माहीती प्रमाणे राजकमल चौक सिताराम बाबा मार्केट ऑटो गल्ली येथे सितारामबाबा मार्केट येथिल जैन लॉटरी, जय लॉटरी, धनराज लॉटरी च्या आजु बाजुला असलेल्या लॉटरी सेंटर मध्ये जावुन छापा टाकुन पाहणी केली असता लॉटरी सेंटर मधील संगणकाचे स्क्रिनवर फनटार्गेट, प्ले पकी, गोल्डन चान्स वेबसाईडटवर अवैध असलेले चक्री व घोडा हे ऑनलाईन गेम पैशाची देवान घेवान करून ११ इसम खेळ खेळवितांना व २० इसम खेळ खेळातांना दिसुन आले.

त्यानुसार संगणक हातळणा-या इसमांना वैध्य परवानाबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यांचेकडे शासनाचा कोणताही परवाना नसल्याचे सांगीतले यावरून खेळ खेळविणा-या इसमांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नांव १) अनिल उदाराम रामरख्यानी वय ५६ वर्ष रा. रामपुरी कॅम्प अमरावती २) निखील प्रभाकरराव निर्मळ वय ३० रा. ग्राम पिंपळखुटा अमरावती ३) सतिश नारायण नखववाल वय ४१ रा. पार्वती नगर अमरावती ४) प्रेम भिमराव किस्नापुरे वय २४ रा. भारतीय महाविद्यालय समोर राजापेठ अमरावती ५) चरणसिंग राजाभाऊ पाटील वय ४८ रा. काँग्रेस नगर अमरावती ६) विक्की ज्ञानेश्वर आठवले वय ३८ रा. ग्राम नाचोना दर्यापुर जि. अमरावती ७) आशिष भिकमचंद पंचारीया वय ४३ रा. भाजी बाजार अमरावती ८) जय धनराज रामरख्यानी वय ३२ रा. मणिपुरम ले आउट अमरावती ९) कुनाल प्रदीप मिश्रा वय २७रा. विलास नगर अमरावती १०) प्रमोद गुणवंतराव धोंडे वय ५८ रा. महेन्द्र कॉलनी अमरावती ११) रूपेश मदनलाल आलेकर वय ५० रा. अंबागेट चे आत अमरावती असे सांगीतले

तसेच खेळ खेळणा-या इसमांनी त्यांचे नांव १२) राशिद अली वाहेद अली वय ४४ रा. पाकीजा कॉलनी अमरावती १३) सतिश शांताराम सावले वय ६० रा. अंबापेठ अमरावती १४) सचिन रतन मसराम वय ४७ रा. आदीवासी कॉलनी अमरावती १५) अब्दुल फईम अब्दुल सलीम वय ३५ रा. गौस नगर अमरावती १६) राहुल ज्ञानेश्वरराव नागदिवे वय २६ रा. किरण नगर गल्ली नं. २ अमरावती १७) मंगेश अरविंद बारड वय ४० रा. भुतेश्वर चौक अमरावती १८) गोवर्धन माणिकराव रेवरकर वय ५१ रा. वडाळी इंद्रशेष बाबा मंदीरा जवळ अमरावती १९) अब्दुल रहीम अब्दुल बशीर वय ३४ रा. नमुना गल्ली नं. ३ अमरावती २०) गौरव नामदेवराव वानखडे वय २७ रा. उत्तम नगर अमरावती २१) निलेश दिपकराव भटकर वय ३६ रा. कल्याण नगर चौक अमरावती २२) अक्षय शिवदास काजे वय ३२ रा. महाविर नगर अमरावती २३) विकास दादाराव गवई वय ३० रा. महात्मा फुले नगर कठोरा रोड अमरावती २४) विनोद वसंतराव खोब्रागडे वय ४३ रा. ग्राम पद्मापुर जि. चंद्रपुर २५) राजेश सुखदेवराव आलोकार वय ५० रा. ग्राम गौरखेडा जि. अमरावती २६) उजेफ खान कलीम खान वय २० रा. लालखडी जि. अमरावती २७) दिपक भिकुसिंग छाडी वय ४५ रा. बेलपुरा अमरावती २८) पंकज मोतीराम सोनोने वय ४५ रा. यशोदा नगर नं. ३ अमरावती २९) सागर सज्जनराव वानखडे वय २६ रा. शिवाजी नगर नं. ३ अमरावती ३०) पियुष अमरावती असे सांगीतले
नमुद सर्वाची अंगझडती घेवुन जुगाराचे नगदी १४५७२०/- रू. तसेच २२ नग मोबाईल, अवैधरीत्या ऑन लाईन जुगार लॉटरीचे साहीत्य ६५०९३०/- रू. असा एकुण ७९६६५०/- चा मुद्देमाल त्यांचे ताब्यातुन जप्त करून ताब्यात घेतला. जुगार खेळविणा-या इसमांना विश्वासात घेवुन अवैध्यरीत्या ऑनलाईन लॉटरी सेंटर मध्ये जुगार चालविणा-या मालकांबाबत विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, सदरचे ऑनलाईन सेंटरचे मालक १) धनराज रामरख्यानी रा. रामपुरी कॅम्प अमरावती २) बबलु आठवले रा. महाजनपुरा अमरावती ३) विजय जैन रा. भाजी बाजार अमरावती ४) शरद नागडीया रा. अमरावती हे असल्याचे सांगीतले. त्यांचा शोध घेतला असता ते मिळुन आले नाही.ताब्यात घेतलेल्या इसमांचे व फरार असलेल्या ४ इसमांविरुध्द महा जुगार कायद्याप्रमाने होत असल्याने त्यांचे विरूध्द पोलिस स्टेशन सिटी कोतवाली येथे गुन्हा नोदं करण्यात आला असुन पुढिल तपास पो.स्टे. सिटी कोतवाली करीत आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अरविंद चावरीया, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे ,पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर पोलिस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त(गुन्हे) शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ चे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण, यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले, पोउपनि संजय वानखडे, पोहवा गजानन ठेवले, दिपक सुंदरकर, मनोज ठोसर, आस्तिक देशमुख, नापोशि संग्राम भोजने, मंगेश शिंदे, पोशि योगेश पवार, राजीक रायलीवाले विशाल वाकपांजर, सागर ठाकरे, चेतन कराडे, चालक पोहवा संदीप खंडारे, पोशि चेतन शर्मा, राहुल दुधे यांचे पथकाने केली आहे.


