
मोबाईल चोरट्यास सिटी कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या..
सिटी कोतवाली(अमरावती शहर) – सवीस्तर व्रुत्त असे की पो स्टे सिटी कोतवाली पोलिस स्टेशन अमरावती शहर येथे फिर्यादी मेघा सतीश ओरीया वय 21 वर्ष रा मैसानंगज अमरावती यांनी दिनांक 23.10.2023 रोजी येवुन रिपोर्ट दिला की, ती दि. 22/10/2023 फिर्यादी ही घरी झोपली असतांना व तिचा मोबाईल तीच्या
आईजवळ होता रात्री 11:50 वा अचानक फिर्यादीला त्यांच्या आई चा ओरडण्याचा आवाज आला त्यामुळे जागी झाली तेव्हा आई चोर चोर असे ओरडत होती मी उठल्यानंतर आईने सांगितले की ती त्या मोबाईल मध्ये यु ट्युब पाहत होती व मोबाईल घरात ठेवून ती बाथरूमला गेली असताना एक मुलाने त्यांचा विवो कंपनीचा मॉडेल नंबर Y11 किंमत अंदाजे 4000/- रुपयांचा चोरून नेला तो पळून गेला व त्याला पळतांना आईने पाहिले तो परिसरात राहणारा प्रफुल बिजोरे होता अशा जबानी रिपोर्ट वरून अप क्रमाक 477/23 कलम 380 भा.द.वी चा गुन्हा दाखल करून तपास सुरु असतांना
सदर गुन्हाचे तपासात आज दि 24.11.2023 रोजी गुप्त बातमीदार कडुन माहीती मिळीली की
प्रफुल उर्फ गोलू राजु बीजोरे वय 31 रा मोरबाग मसानगंज अमरावती


हा चोरी चा मोबाईल जवळ बाळगत आहे. वरुन दोन पंचासह जावुन सदर आरोपीला ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता प्रफुल उर्फ गोलू राजु बिजोरे वय 31 रा मोर्रबाग मसानगंज अमरावती असे सांगीतले वरुन त्यास चोरी चा मोबाईल बाबत विचारपुस केली असता. त्याने दि. 22/10/2023 रोजी रात्री 11.50 फिर्यादी नामे मेघा सतीश ओरीया वय 21 वर्ष रा मसानंगज अमरावती याचे घरुन मोबाईल चोरी केल्याचे सांगत असल्याने आरोपी नामे प्रफुल उर्फ गोलु राजु बिजोरे वय 31 रा मोरबाग मसानगंज अमरावती याचेकडुन विवो कंपनीचा मॉडेल नंबर Y11 किंमत अंदाजे 4000/- रुपयांचा सदरचा जप्त करुन गुन्हा उघड करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी साहेब, अमरावती शहर, पोलिस उपायुक्त परिमंडळ-2 सागर पाटील, सहा, पोलिस आयुक्त शिवाजीराव बचाटे राजापेठ विभाग पोलिस निरीक्षक विजयकुमार वाकसे यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा मनोज काळपांडे
रवीद्र हरणे,स्वप्निल भारती यांनी केली.



