स्फोटकाची निष्काळजीपणाने वाहतुक करणारा बडनेरा पोलिसांच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

स्फोटकांची (जिलेटीन नळकांडे) निष्काळजीपणाने वाहतुक करणार्यास बडनेरा गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने घेतले ताब्यात…

अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शहरातील सर्व पोलिस स्टेशन प्रभारींना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मान होऊ नये म्हनुन आपआपले हद्दीत पेट्रोलिंग, नाकाबंदी करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या







त्याअनुषंगाने बडनेरा वरिष्ठ पोलिस निरीक्षक पुनित कुलट यांचे आदेशाने पोलिस स्टेशन बडनेरा, अमरावती शहर येथील पोउपनि तुषार गावंडे सोबत पो. स्टाफ असे दिनांक २५/०३/२०२४ रोजी पोलिस स्टेशन बडनेरा हृद्यीत पेट्रालिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक इसम टु व्हिलर क्रमांक MH 28 N 506 वर पिवळ्या रंगांच्या पोत्यामध्ये स्फोटक पदार्थाची वाहतुक करीत आहे. अशा माहितीवरून आरोपी नामे शंकरलाल
सुखदेव गुर्जर, वय २३ वर्षे, रा. खाकरीखेडा, चतरभुजपूर पोस्ट गुदंली, ता. मांडल, जि. भिलवाडा, राज्य राजस्थान ह.मु. ग्राम मांजरी मसला, ता. जि. अमरावती यास ताब्यात घेवून त्याचे ताब्यातून १) १०० जिलेटीन कांड्या किं. ३,००० /- रूपये २) १०० नग केसरी रंगांची वायर लागलेले ईलेक्टॉनिक डिटोनेटर किं.२,००० /- रूपये ३) एक हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल क्रमांक MH 28 N 506 किं. ५०,०००/-रूपये असा एकूण किं.अं. ५५,००० /- रु मिळून आल्याने नमूद आरोपीचे ताब्यातून पंचासमक्ष जप्त करून पो.स्टे.ला अप. क्रमांक २२८/२०२४ कलम ९ ( ब ) बारी पदार्थ अधिनियम १८८४, सहकलम ५, ६ बारी पदार्थ अधिनियम १९०८, सहकलम २८६, ३४ भादंवि सहकलम १३५ मपोका प्रमाणे गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात आली आहे.



सदरची कारवाई पोलिस आयुक्त  नविनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त परिमंडळ – १  सागर पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त कैलाश पुंडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन बडनेरा, अमरावती शहर चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पुनित कुलट, पोनि प्रफुल गिते,पोउपनि तुषार गावंडे, सफौ अहेमद अली , पोहेवा  प्रेमचंद रावत,घनश्याम यादव मंगेश परिमल, संजय भेलाये,नापोशि मनमोहन दहातोंडे,रोशन निसंग, प्रविण ढेंगेकर, प्रविंद्र राठोड, इरफान रायलीवाले,शशिकांत शेळके,पोशि विशाल पंडीत, विक्रम नशिबकर,जावेद पटेल,अभिजीत गावंडे, राजकुमार राऊत,रामकृष्ण कांगडे यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!