
अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने २४ तासाचे आत उघड केला चोरीचा गुन्हा…
अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने शहरातील चोरीचा २४ तासाचे आत लावला छडा….
अमरावती(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील तक्रारदार गणेश अण्णाजी देशमुख वय 54 वर्षे रा.
आष्टी पो. स्टे. वलगाव हे दि.(०५) रोजी संध्या 5.०० वा चे दरम्यान इतवारा येथे साहीत्य खरेदी करीत असतांना त्यांनी त्यांचे टुव्हीलर गाडी क्रमांक एमएच / 27 / बीजी / 7910 या गाडीला हिरव्या – पाढ-या रंगाची टांगुन ठेवली होती त्यामध्ये एक सोन्याचा गोफ वजन अंदाजे 20 ग्रॅम किंमत अंदाजे 70,000/- रू. व बॅक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम व वाहन परवाना असे साहीत्य होते ते त्यांची नजर चुकवून कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेली. अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पो. स्टे. सिटी कोतवाली येथे अपराध क्रमांक 217 / 24 कलम 379 भा.द.वि.चा नोंद करण्यात आला होता


सदर गुन्हयाचा गुन्हे शाखा युनीट 1 अमरावती शहर हे समांतर तपास करीत असतांना तांत्रीक विश्लेषन व फुटेज द्वारे सदरची चोरी ही शेख सलीम अब्दुल रशीद नावाच्या रेकॅार्डवरील गुन्हेगाराने केल्याचे निष्पन्न करुन त्यास दिनांक 06/06/2024 रोजी सायंकाळी 6.00 वा.चे दरम्यान गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे गवळीपुरा येथे राहणारा शेख सलीम अब्दुल असल्याने सदर इसमाचा शोध घेतला असता गवळीपुरा येथे मिळुन आल्याने त्याला ताब्यात घेवुन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव शेख सलीम अब्दुल रशीद वय 40 वर्षे
रा. गवळीपुरा मस्जिद जवळ अमरावती असे सांगीतले. यावरुन त्याचे ताब्यातुन गुन्हयात चोरी केलेली पिशवी व त्यामधील एक सोन्याचा गोफ वजन अंदाजे 20 ग्रॅम किंमत अंदाजे 70,000/-रू. व बॅंक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम व वाहन परवाना इत्यादी मुददेमाल जप्त करण्यात आला. आरोपी व मुददेमाल ताब्यात घेवुन पुढील तपासकामी पोलिस स्टेशन सिटी कोतवाली यांचे ताब्यात देण्यात आला
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त, नवीनचन्द्र रेड्डी, पोलिस उपायुक्त
मुख्यालय कल्पना बारावकर, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट 1 चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा राजूआपा, फिरोज खॉन, सतीष देशमूख, नाईक पोलिस अंमलदार दिनेश नांदे, विकास गुडदे, सुरज चव्हाण, निखील गेडाम, निवृत्ती काकड, अमोल मनोहर, चालक अमोल बहादरपूरे, अलीमोददीन, रोशन माहुरे, किशोर खेंगरे यानी केलेली आहे.



