राष्टीय पक्षाच्या नेतेमंडळींना वरीष्ठ पोलिस अधिकारी यांच्याशी बोलतांना ही भाषा शोभते का…
राष्ट्रीय पक्षाच्या जबाबदार नेत्यांना आयुक्त दर्जाच्या पोलिस अधिकारी यांना त्याचेच दालनात येऊन मुळ विषयाचे विषयांतर करुन तुमचे अवैध धंदेवाल्यांशी लागेबांधे आहेत हे बोलने कितपत योग्य…..
अमरावती (शहर प्रतिनिधी) – खासदार अनिल बोंडे यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं . राहुल गांधी यांच्या जीभेला चटके दिले पाहिजेत, असं वादग्रस्त विधान खासदार बोंडे यांनी केलं होतं. बोंडे यांच्या विधानानंतर काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर ह्या आक्रमक झाल्या. एवढे होऊन सुद्धा कसलेच गांभीर्य न दाखवल्यानं तसेच बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यानं यशोमती ठाकूर पोलिस अधिकाऱ्यांवर चांगल्याच भडकल्या, कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असते. उद्या जर काही अशांतता झाली तर त्याला तुम्ही जबाबदार असाल, बघा बघा जरा अमरावतीकर तुमच्याबद्दल काय विचार करतात, असे म्हणत त्यांनी चक्क कार्यालयात बसून ‘नही चलेगी, नही चलेगी तानाशाही नही चलेगी’ असे म्हणत त्यांनी पोलिस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरून सुनावले, “असंच विधान एखाद्या काँग्रेसवाल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलं असतं, तर तुम्ही सहन केलं असतं का?” असा सवाल यशोमती ठाकूर यांनी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डीं यांना विचारला, तसेच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही आग लावली आहे. उद्या राहुल गांधी यांना काय झालं तर सरकार आणि पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हे जबाबदार असतील असे सुद्धा त्या म्हणाल्या.
या मध्ये विशेष म्हणजे बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या कि, यांचे गुटखे वाल्यांशी-अवैध धंदे वाल्यांशी लागेबांधे आहेत. यांच्यात दम नाही हे सगळे लाचार आहेत हे कारवाई करू शकत नाहीत. यांच्यामुळे अवैध धंदे वाल्यामधे भांडणे आहेत कारण कि, हे एकावर कारवाई करतात आणि एकावर करत नाहीत. आणि तुम्हाला काहीच माहित नाही, ‘चला मग आपण मिळून गुटखा पकडू, मी सांगते तुम्हाला कुठं गुटखा मिळतो ते’ किती पैसे देतात तुम्हाला,सर्वात जास्त गुटखा कुठं आहे तर अमरावतीत आहे.
हे एखादया लोकप्रतिनीधीने वरिष्ठ अधिकाऱ्याला असं बोलणं योग्य आहे का…? जो विषय होता तो विषय सोडून दुसरा विषय काढायची काय गरज होती…? हे नक्की निवेदन द्यायला गेले होते का पोलिसांशी हुज्जत घालून पोलिस खात्याची बदनामी करायला..? ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रिद असलेल्या पोलिस खात्याची प्रतिष्ठा व अस्मिता हि राजकीय नेत्यांच्या दबावाखाली काम करते का काय…? या मुळे पोलिस डिपार्टमेंटवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात. त्यांचा राग हा साहजीकच आहे. पण अवैध धंद्यांना घेऊन जो राग होता तो राग त्यांनी असं सार्वजनिक करायची गरज होती का..? अशा अनेक चर्चा ह्या पोलिस खात्यात होताना दिसत आहेत. पण या वर कोणी काहीच बोलू शकत नाही, शेवटी नोकरी हि नियमांच्या जाळ्यात असल्याने गप्प बसाव लागतं असं म्हणायला हरकत नाही.
लोकप्रतिनिधी आणि पोलिस अधिका-यांमध्ये जर सौजन्य, सौहार्दाचे वातावरण नसेल तर इतरांसोबत राहिल का…? असा प्रश्न या निमित्त उपस्थित होत आहे. तेच लोकप्रतिनिधी लोकांच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी किंवा एखाद्या सकारात्मक कामासाठी पोलीस ठाण्यात किंवा एखाद्या शासकीय कार्यालयात इतक्या तळमळीने जातात का…? एखाद्या आमदार, खासदाराने पोलिस ठाण्यात फोन केलाच तर तो अवैध धंद्यात पकडल्या गेलेल्या किंवा गुन्ह्यात अडकलेल्या कार्यकर्त्याच्या सुटकेसाठीच करतो. एखादा पोलिस अधिकारी फोनवर ऐकत नसेल तर मग स्वत: पोलिस ठाण्यात जाऊन ठाण मांडून बसतो. पोलिसांचा धाक कमी झाला असे हल्ली सर्रास बोलले जाते, ते अशाच काही अनुभवांमुळे, पोलिस हे त्यांच्यापरीने समस्येला भिडतांना दिसतात. परंतु, दररोज नवनवी आव्हाने, राजकीय दबाव या मुळे पोलिस मनात असून पण मनासारखं काही करू शकत नाही.