
शेतमालकाचा खुन करुन पसार होणार्या दांपत्यास २४ तासाच्या आत केली अटक….
अमरावती(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०५/११/२०२३ रोजी पो स्टे परतवाडा येथे फिर्यादी गजानन महादेवराव येवले रा. देवगाव ता. अचलपुर यांनी रिपोर्ट दिला कि, दि.०४/११/२०२३ रोजी त्यांचे लहाण भाउ राजु येवले हे शेतात गेले
असता शेतातील मजुरीने कामावर असलेले दिलीप व त्याची पत्नी यांनी राजु येवले याचा खुन केला व पळुन गेले अशा रिपोर्ट वरुन पो.स्टे. परतवाडा येथे अप क. ९६२/२३ कलम ३०२,३४ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहता अविनाश बारगळ सो. अमरावती प्रा यांनी स्थानिक गुन्हे शाखेला
लवकरात लवकर आरोपींचा शोध घेवून अटक करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने किरण वानखडे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांनी सदर आरोपीचा शोध घेणे कामी स.पो.नि. सचिन पवार यांचे पथक नेमण आरोपी शोध घेणे कामी मार्गदर्शन केले. आरोपीचा शोध घेत असता गोपनिय
बातमीदाराकडुन माहीती मिळाली कि, राजु येवले याचा खुन करणारे महिला व पुरुष हे मुर्तिजापुर शहरात गेले आहेत. अशा माहीती वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ मुर्तिजापुर जि. अकोला येथे रवाना झाले व गुन्हयातील फरार आरोपी यांचा मुर्तिजापुर परीसरात शोध घेत असतांना यातील महिला व पुरुष आरोपी हे मुर्तिजापुर रेल्वे स्टेशन मागील शेतातील एका झोपडीत लपुन बसुन दिसले. वरुन त्यांना सापळा लावुन शिताफिने ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यातील पुरुषाने त्याचे नाव दिलीप उर्फ दिपक गुलाब पटेल वय ३९ वर्ष रा. सांवगी,
औरंगाबाद व महिलेने तिचे नाव कपुरा जयराम उइके वय ४० वर्ष रा. केशरपुर, चिखली, अमरावती असे सांगितले. त्यांना परतवाडा येथील राजु येवले याचे खुनाबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि, ते मागील ०८ ते १० दिवसापासुन गजानन येवले रा.देवगाव याचे शेतात सोकारी म्हणुन मजुरीने काम करीत होते. दि ०४/११/२०२३ रोजी गजानन येवले याचा भाउ राजु येवले हा
शेतात आला आणी त्याने कपुरा उईके हिचेवर वाईट नजर ठेवल्याने आरोपी दिलीप व मृतक राजु येवले यांचेत वाद झाला. त्यामुळे त्यांनी दोघांनी मिळुन राजु येवले याचा खुन केला. असे सांगितले.
दोन्ही आरोपींनी खुनाची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचे कडुन दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. दोन्ही आरोपी यांना पुढील तपासकामी पो.स्टे. परतवाडा यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई अविनाश बारगळ, पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा., शशिकांत सातव, अप्पर पोलिस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात किरण वानखडे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अम.ग्रा.
यांचे नेतृत्वात सहा पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, महिला पोलिस अंजली आरके चालक मंगेश मानमोडे सह सायबर विभागचे पोलिस अंमलदार सागर धापड यांनी केली.


