
रस्त्याने एकट्या जाणाऱ्या महीलेस गाठुन जबरीने दागिणे हिसकावनारे,गुन्हे शाखेच्या ताब्यात….
अमरावती ग्रामीण हद्दीत तसेच अमरावती शहरामध्ये एकटया बाईला हेरुन चाकुचा धाक दाखवुन जबरीने लुटनारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…..
अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २१/११/२०२४ रोजी यातील फिर्यादी सौ. वैशाली शिवाजी पुसदकर वय ४५ वर्ष, रा. कोलार ता. मानोरा जि. वाशिम यांनी पोलिस स्टेशन नांदगाव खंडेश्वर येथे तक्रार दिली कि, दि. २१/११/२०२४ रोजी सकाळी ११:३० वा. दरम्यान त्या सावंगा गुरव बस स्टॉप वरुन पायदळ सावंगा गुरव गावात त्यांचे आईकडे जात असतांना वाटेत दोन अनोळखी इसमाने मोटारसायकलवर येवून त्यांना चाकुचा धाक दाखवुन त्यांचे गळयातील ४ ग्रॅम सोन्याचे मनी असलेली पोत कि.अं. २४०००/-रु ची जबरीने तोडुन हिसकावुन नेली. अशा तक्रारीवरुन पोलिस स्टेशन. नांदगाव खंडेश्वर, येथे अप.क्र. ४५१/२४ क. ३०९ (४),३५१ (३) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.


तसेच अशाच प्रकारचा गुन्हा पोलिस स्टेशन तळेगाव दशासर हद्दीतील ग्राम बग्गी, पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे हद्दीतील ग्राम लालखेड, ग्राम पळसखेड, मांजरखेड व अमरावती शहर हद्दीतील पोलिस स्टेशन वलगाव हद्दीतील ग्राम विर्शी, देवरी निपानी येथे शेतातुन एकटया घरी परत येणाऱ्या बाईला हेरुन चाकूचा धाक दाखवुन गळयातील दागीने जबरीने हिसकावणे अशा जबरी चोरीच्या घटना अज्ञात आरोपी सतत करत होते.सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलिस अधिक्षक. विशाल आनंद यांनी अमरावती ग्रामिण हद्दीत चाकुचा धाक दाखवून एकटया बाईचे दागीने लुटून जबरी चोरीच्या घटना करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून कारवाई करण्याबाबत सुचना निर्गमीत केल्या होत्या.

त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाथेचे पोलिस निरीक्षक. किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे चांदुर रेल्वे उपविभागातील पोउपनि मो. तस्लीम व मोर्शी उपविभागातील पोउपनि सागर हटवार यांचे पथक जबरी चोरीच्या घटनेचे ठिकाण व वेळ तसेच फिर्नीयादीने तक्रारीत नमुद केलेले आरोपीचे वर्णनाचा सखोल अभ्यास करुन रेकॉर्डवरील, जेलमधुन सुटून आलेल्या गुन्हेगारांवार पाळत ठेवून आपआपले बातमीदारांमार्फत गुन्हेगारांची माहिती घेवून गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना पथकाला गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सदरचे गुन्हे हे मोहम्मद शाहरुख मोहम्मद रफीक रा.अडगाव (खा.) ता. अंजनगाव सुर्जी, हा त्याचे साथीदारासह करत असुन तो मुस्कान नगर, अमरावती येथे त्याचे कुटुंबासह मागील ७-८ वर्षापासुन भाडयाने राहत आहे.

अशा मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन पथकाने मुस्कान नगर मध्ये गोपनिय बातमीदार नेमुन नमुद आरोपीबाबत इंत्यभुत माहिती प्राप्त केली असता नमुद आरोपी हा मागील काही दिवसांपासुन वेगवेगळ्या मित्रांसोबत फिरत असुन त्याची कुवत नसतांना सुध्दा खर्च करीत असल्याची माहिती मिळाली. सतत ३ दिवस आरोपीवर पाळत ठेवून अमरावती शहरातील ट्रान्सपोर्ट नगर मधील टॉवर लाईन परिसरातुन १) मो. शाहरुख मो. रफीक वय २२ वर्ष, रा. अडगाव खाडे, ता. अंजनगाव सु. ह.मु. मुस्कान नगर, अमरावती २) मो. शोएब मो. सलीम वय २३ वर्ष,रा. मुस्कान नगर, अमरावती ३) सैय्यद मोहसीन सैय्यद हसन वय २७ वर्ष, रा. पठाण चौक अमरावती ४) जावेद खान जाकीर खान वय २३ वर्ष, रा. अलकरीम नगर नं. २, अमरावती यांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात असलेल्या १) मो. शाहरुख मो. सलीम रा. अमरावती यास गुन्हयासंबंधाने विश्वासात घेवून विचारपुस केली असता सुरूवातीला नमुद आरोपी उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता आरोपीने अमरावती ग्रामीण अंतर्गत १) पो.स्टे. तळेगाव दशासर हद्दीतील ग्राम बग्गी, २) पो.स्टे. चांदुर रेल्वे हद्दीतील ग्राम लालखेड, ग्राम पळसखेड, मांजरखेड व अमरावती शहर हद्दीतील ३) पो.स्टे. वलगाव हद्दीतील ग्राम विशीं, देवरी निपानी येथे घडलेल्या सर्व घटनां २) मो. शोएब मो. सलीम ३) से. मोहसीन सै. हसन ४) जावेद खान जाकीर खान सर्व रा. अमरावती या साथीदारांसह केल्याची कबुली देवून मो. शाहरुख हा कर्जबाजारी असल्याने व त्याचे साथीदारांना खर्चाला पैशाची चनचन भासत असल्याने त्यांनी मिळून खेडयापाळयाने आळीपाळीने वेगवेगळया मोटरसायकलवर जावुन शेतातुन किंवा रोडने एकट्या जाणाऱ्या येणाऱ्या बायांवर पाळत ठेवून बाईला चाकुचा धाक दाखवुन जबरीने त्यांचे गळयातील सोन्याचे दागीने तोडुन पळुन जात असल्याचे सांगीतले.
सदर आरोपींकडुन जबरी चोरीचे खालील गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे. १) पो.स्टे. नांदगाव खंडेश्वर अप.क्र. ४५१/२४ क. ३०९ (४),३५१ (३) भा.न्या.सं. २) पो.स्टे. तळेगाव दशासर अप.क्र. ३८२/२४ क. ३०९ (४) भा.न्या.सं. ३) पो.स्टे. चांदुर रेल्वे अप.क्र. ६१४/२४ क. ३०३(२) भा.न्या.सं. ४) पो.स्टे. चांदुर रेल्वे अप.क्र. ६५१/२४ क. ३०९ (४), ३ (५) भा.न्या.सं.५) पो.स्टे. चांदुर रेल्वे अप.क्र. ६५०/२४ क. ३०९ (४),३ (५) भा.न्या.सं.६) पो.स्टे. वलगाव, अमरावती शहर अप.क्र. ३४३/२४ क. ३०९ (४),३ (५) भा.न्या.सं.७) पो.स्टे. वलगाव, अमरावती शहर अप.क्र. ३५७/२४ क. ३०९ (४),३ (५) भा.न्या.सं. तसेच पो.स्टे. तळेगाव हद्दीतील ग्राम बग्गी येथे दि.१९/११/२०२४ रोजी रोडने एकट्या जाणाऱ्या बाईला नमुद आरोपीनी चाकुचा धाक दाखवुन जबरीने तीचे गळयातील दागीने लुटले परंतु ते दागीने बेनटेक्स चे असल्याचे आरोपीच्या लक्षात आल्याने त्यांनी फेकुन दिले. घटनेसंदर्भात फिर्यादीकडुन आता पावेतो तक्रार देण्यात आलेली नाही. नमुद घटनेतील फिर्यादी कडुन पो.स्टे. ला तक्रार देण्यास विलंब होत असल्याने तक्रार दाखल होताच गुन्हयात नमुद आरोपी अटक कारवाई करण्यात येते.
नमुद आरोपीचे ताब्यातून सोन्याचे दागीने एकुण ७.५९० ग्रॅम किमंत ६२०००/-रु चे व गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वेगवेगळया कपंनीच्या ३ मोटरसायकल किमंत १,८०,०००/-रु असा एकुण २,४२,०००/-रु चा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. आरोपीकडून एकुण ७ गुन्हयाची उकल करण्यात आली असून तपासात अधिक गुन्हयांची उकल होण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत,पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. मोहम्मद तस्लीम, पो.उप.नि. सागर हटवार, पो.उप.नि. नितीन इंगोले, श्रेणी पोउपनि मूलचंद भांबुरकर, पोलीस अंमलदार अमोल देशमुख, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, बळवंत दाभणे, गजेंद्र ठाकरे, रवि बावणे, भुषण पेठे, पंकज फाटे, से. अजमत, सुनिल महात्मे, सुधीर बावने, निलेश डांगोरे, सचिन मिश्रा, शकिल चव्हान व पोलीस स्टेशन सायबर चे सागर धापड, रितेश वानखडे, चेतन गुल्हाने, गुणवंत शिरसाठ चालक अंमलदार संजय प्रधान, हर्षद घुसे, प्रशांत राजस, आदेश गुंजरकर यांनी केली.


