अचलपुर शहरात गांजाची चोरटी वाहतुक करणारा LCB पथकाचे ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अचलपुर शहरात गांजाची चोरटी वाहतुक करणा-या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन जप्त केला  एकुण १,०२,०००/- रु चा  मुददेमाल जप्त….

अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्हा पोलिस अधिक्षक  विशाल आनंद  यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा यांना मार्गदर्शन करून फरार आरोपी अटक करणे, तसेच अवैधधंदे
करणा-यांवर प्रभावी कार्यवाही करुन अवैधधंदयांना आळा घालणे बाबत आदेशीत केले आहे.
त्यानुसार दिनांक १४/०४/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा चे पथक उपविभाग अचलपुर हददीमध्ये पेट्रोलिंग करीत असता गोपनिय खबर प्राप्त झाली कि, एक इमस त्याचे काळया रंगाचे होन्डा शाईन मोटर सायकलवर चांदुर बाजार नाका अचलपुर ते इदगाह चौक, अचलपुर या रस्ताने अवैधरित्या गांजा (अंमली पदार्थ) विक्री करीता घेवुन येणार आहे.अशा गोपनिय खबरेवरुन स्थागुशाचे पथकाने चांदुर बाजार नाका अचलपुर ते इदगाह चौक, अचलपुर रोडवर नाकाबंदी करुन  छापा कार्यवाही करीता पंचासह सापळा लावला असता मिळालेल्या गोपनिय खबरेप्रमाणे एक इसम संशयितरित्या त्याचे मोटर सायकलवर येतांना दिसला





त्यास पोलिस पथकाने थांबण्याचा इशारा केला असता सदर इसम जागीच न थांबता पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागला असता पोलिस पथकाने त्याची मोटर सायकल अडवुन त्यास खाली उतरविले. सदर इसमाने त्याचेवर गांजाबाबत कार्यवाही होवु नये म्हणुन त्याचे कमरेत असलेला चाकु काढुन पोलिस पथकावर हल्ला केला. ज्यामुळे एक पोलिस अंमलदार किरकोळ जख्मी झाले. परंतु पोलिस पथकाने आरोपी यास लगेच नियंत्रणात घेवुन त्याचे कडील चाकु ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले  त्याने त्याचे नाव मुख्तार उर्फ मुस्तफा खा मंजुर खा वय २९ वर्ष रा. विलायतपुरा, अचलपुर असे सांगितले वरुन त्याची झडती घेतली असता त्याचे काळया रंगाचे होन्डा शाईन मोटर सायकल क्र. एम एच २७ बि सि ४२३८ चे हॅन्डलला लागलेल्या कापडी थैलीची  रितसर झडती घेवुन पाहणी केली असता थैलीत २ किलो १०० ग्रॅम गांजा (अंमली पदार्थ) कि. अं. २१०००/- रुपयाचा मिळुन आला.वरुन सदर आरोपीचे ताब्यातुन गांजा अंमली पदार्थ एक धारदार चाईना चाकु, गुन्हयात वापरलेली मोटर सायकल असा एकुण १,०२,०००/- रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात येवुन आरोपी यास पुढील तपास कामी पोलिस स्टेशन अचलपुर यांचे ताब्यात देण्यात आले. आरोपीविरुध्द पोलिस स्टेशन अचलपुर येथे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.



सदरची कारवाई पोलिस अधिक्षक विशाल आनंद .अपर पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा.पंकज कुमावत , यांचे मार्गदर्शनात किरण वानखडे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अम.ग्रा.
यांचं नेतृत्वात सहा. पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील
तंवर, सागर नाटं, शांताराम सोनोने, चालक श्याम मते यांनी केली.
पोलिस अधिक्षक अमरावती ग्रामीण
करीता







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!