
जनावरे चोरी करणारी कुख्यात टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद…
चारचाकी वाहनातुन जनावरे चोरी करणारी कुख्यात टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने अखेर केले जेरबंद,गोवंश चोरीचे २ गुन्हे केले उघड….
अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अवैध गोतस्करी तसेच गोवंशाची चोरी करुन त्यांची निर्दयतेने वाहतुक करणार्यावर कडक कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी सर्व प्रभारींना दिले होते त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने पथके तयार करुन जिल्ह्यातुन गोवंश चोरीकडे लक्ष केंद्रीत केले त्यानुसार दि २९ जानेवारी रोजी किशोर किसनराव कोकाटे वय ३५ वर्ष, रा. सुलतानपुर यांनी गोवंश चोरी झाल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरुन दि २८ जानेवारी रोजी रात्री दरम्यान त्यांचे मालकीची एक गाय कि.अं. २०,०००/-रु ची घराबाहेर बांधुन ठेवली असतानां अज्ञात इसमांनी चोरुन नेली अशा तक्रारीवरुन पो.स्टे. तळेगाव दशासर येथे अप.क्र. २१/२०२५ कलम ३०३(२) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच अशाच प्रकारचा गुन्हा पो.स्टे. नांदगाव खंडेश्वर येथे दाखल असून सदर गुन्हयात २ जनावरे कि.अं. ३०,०००/-रु चे चोरी गेल्याने तक्रारीवरुन दोन गुन्हे नोंद करण्यात आले.


त्या अनुषंगाने जनावरे चोरी संबंधाने दाखल गुन्हयाचा समांतर तपास स्था.गु.शा., अम.ग्रा. येथील पो.उप.नि. मो. तस्लीम व त्यांचे पथक हे रेकॉर्डवरील आरोपीचा शोध घेणे करीता चांदुर रेल्वे उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की, शेख राजीक शेख रज्जाक रा. अलकबीर नगर, यवतमाळ हा त्याचे साथीदारासह जनावरे चोरी करीत असुन तो सध्या जनावरांची रेकी करण्याकरीता देवगाव चौफुली येथे त्याचे साथीदारासह उभा आहे. अशा माहितीवरुन लागलीच स्था.गु.शा.पथक देवगाव येथे पोहचुन १) शेख राजीक शेख रज्जाक वय २८ वर्ष, रा. अलकबीर नगर, यवतमाळ व त्याचा साथीदार २) अफजल उर्फ सोनु खान अफसर खान पठाण वय २८ वर्ष, रा. रुग्नालय सोसायटी, यवतमाळ याचेसह मिळुन आला. वरुन नमुद दोन्ही ईसमांना गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता त्यांनी ग्राम सुलतानपुर पो.स्टे. तळेगाव दशासर येथून एक तसेच ग्राम नांदगाव खंडेश्वर हद्दीतुन दोन जनावरे त्यांचे ईतर ५ साथीदारासह चोरी केल्याची कबुली देवून जनावरे चोरी केल्यानंतर कटाई करीता मोहीन खॉ शब्बीर खॉ पठाण रा. पठाण चौक, नेर जि. यवतमाळ वाला दिल्याचे सांगीतले वरुन नेर जि. यवतमाळ येथुन ३) मोहीन खॉ शब्बीर खॉ पठाण वय २५ वर्ष, रा. पठाण चौक, नेर जि. यवतमाळ याला ताब्यात घेवुन ईतर फरार ४ आरोपींचा शोध घेतला मिळून आले नाही.

ताब्यात घेतलेल्या इसमांचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेली १) इनोव्हा चारचाकी गाडी कि.अं. ५,५०,०००/-रु २) मोटर सायकल कि.अं. ६०,०००/- ३) एक मोबाईल कि.अं. १०,०००/-रु असा एकुण ६,२०,०००/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमुद आरोपीतांन कडुन एकुण ३ गुन्हयांची उकल करण्यात आली असुन त्यांना पुढील कार्यवाही करीता पो.स्टे. तळेगाव दशासर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक विशाल आनंद,अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत,पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. मोहम्मद तस्लीम, श्रेणी पोउपनि मुलचंद भांबुरकर, अमंलदार अमोल देशमुख, मंगेश लकडे, सचिन मांगे, दिनेश कनोजीया, गुणवंत शिरसाठ, चेतन गुल्हाने, सागर धापड, रितेश गोस्वामी व चालक हर्षद घुसे यांनी केली.


