मार्डी येथील भोंदुबाबास भोपाळ येथुन केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

मार्डी येथील गुरूदासबाबास भोपाळ (मध्य प्रदेश) येथून 
स्था.गु.शा.पथकाने केली अटक….

अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
पोलिस स्टेशन  कु-हा हद्दीत ग्राम मार्डी येथील आश्रमात आरोपी





गुरूदास बाबा ऊर्फ सुनिल जानराव कावलकर, वय ४७, रा. मार्डी,ता.तिवसा





हा लोकांची दिशाभुल करून विविध रोगांवर उपचार करून देतो अशी बतावणी करीत होता. त्या दरम्यानचे काळात एक जबलपुर (मध्यप्रदेश) येथील महीला (पिडीत) तीचे कौटूंबीक कलह समस्या सोडविण्यासाठी उपचारार्थ याच आश्रमात आली त्यावेळी सदर आरोपी बाबाने तीला आश्रमातच वास्तव्यास राहुन उपचार घेणेबाबत सांगीतले. अंधश्रध्देपोटी सदर पीडीत महीला आश्रमात  एप्रिल महीण्यापासुन  Mara वास्तव्यास होती. दरम्यानचे काळात नमुद आरोपीने तीला वेळो-वेळी भुलथापा देवुन तसेच तुझे पतीने तुला सोडुन दिल्यास मी तुझ्याशी लग्न करतो अशी बतावणी करून तिला अंगारा खायला देवुन तीचे शाररीक शोषण केले व त्याची चित्रफित त्याने त्याचे मोबाईलमध्ये तयार केली.
त्यानंतर सदर चित्रफितीची धमकी देवुन सदर महीलेचे शोषण करणे सुरूच ठेवले होते. सदर महीलेने घडलेला प्रकार आपले
नातेवाईकांना कथन करून दि. २५/०१/२४ रोजी पो.स्टे. कु-हा येथे तक्रार दाखल केली वरून पो.स्टे. कु-हा येथे अप.क्रं. १७/२४ कलम ३७६ (२), ५०६,४१७ भा.दं.वी. सहकलम ६६ (ई) माहीती व तंत्रज्ञान अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा नोंद झाल्यापासुन सदर आरोपी बाबा हा फरार होता. घटनेचे गांभिर्य पाहता विशाल आंनद, पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा.पंकज कुमावत, अपर पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांनी स्था.गु.शा. व कु-हा पोलिसांचे दोन पथक तयार करून फरार आरोपीस तात्काळ अटक करण्याचे दिशानिर्देश दिले होते. आरोपी गुरूदास बाबा ऊर्फ सुनिल जानराव कावलकर, वय ४७, रा. मार्डी,ता.तिवसा

घटनेनंतर वारंवार आपले राहण्याचे ठिकाण सतत बदलत होता. तो फरारी दरम्यान गंगासागर, वाराणसी, बुध्दगया ई. ठिकाणी फिरत पोलिसांना हुलकावणी देत होता. पोलिसांना ओळख पटु नये म्हणुन सदर आरोपीने दाडी-मिशी व डोक्यावरचे केस सुध्दा कापुन
वेषांतर केले होते. स्था.गु.शा.चे पथक सतत सदर आरोपीचे मागावर होते. दि.०८/०२/२०२४ रोजी पथकास गोपनीय माहीतीचे
मिळाली आरोपी हा भोपाळ (म.प्र.) रेल्वे स्थानकावर येणार असुन तेथुन तो दिल्लीला पळुन जाणार आहे. वरून पथकाने तात्काळ भोपाळ गाठुन रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचुन आरोपीस ताब्यात घेतले व पुढील तपासकामी उप-विभागीय पोलिस अधिकारी, चांदुर रेल्वे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही  विशाल आंनद, पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा. कुमावत, अपर पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांचे मार्गदर्शनात किरण वानखडे, पोलिस निरीक्षक.स्था.गु.शा., सागर हटवार, पो.उप.नि. व पो.शि मुलचंद भांबुरकर, अमोल देशमुख, सचिन मिश्रा, मंगेश लकडे, चंन्द्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, संजय प्रधान, सागर धापड, रितेश वानखडे, गुणवंत शिरसाठ, चेतन गुल्हाने यांचे पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!