अनैसर्गिक क्रुत्य करु दिले नाही म्हनुन दगडाने ठेचुन केला खुन…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अनैसर्गिक कृत्य करुन खुन करणा-या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासाच्या आत ताब्यात घेऊन,खुनाचा गुन्हा केला उघड…

मोर्शी(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २४ जानेवारी रोजी पो स्टे मोर्शी हददीत सकाळी ८/०० वा दरम्यान मोर्शी ते अमरावती रोडवरील शिरभाने मंगल कार्यालय जवळ, मोर्शी येथे एका पुरुषाचा मृतदेह आढळुन आला मयताचे शरीरावर व डोक्यावर जबर मारहानीचे निशान होते तसेच मयताचे पॅन्ट व अंतरवस्त्र शरीरावर दिसुन आले नाही सदर मयताची ओळख पटवण्याचे दृष्टीने परीसरात विचारपुस केली असता सदर व्यक्ती हा श्रीकृष्णपेठ, मोर्शी येथील १७ वर्षीय युवक हा असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक दृष्ट्या सदर घटना हि खुन असुन मयताचे डोक्यावर व शरीरावर जड व तिश्न वस्तुने मारुन केला असल्याचे दिसुन आले, त्यावर मयताचे वडील. सुनिल पुडलिकराव चवरे यांचे तक्रारी वरुन पो स्टे मोर्शी येथे अप.क. ४४/२५ कलम १०३(१) भा.न्या संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता





सदर खुनाच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांचे आदेशाने अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत उपविभागिय  पोलिस अधिकारी मोर्शी संतोष खांडेकर यांनी पटनास्थळी भेट देवुन पो.स्टे. मोर्शी व स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा.चे पथकास गुन्हा उघडकिस आणून आरोपीस लवकरात लवकर अटक करण्याबाबत आदेशीत केले होते.त्यानुसार पो.स्टे. मोर्शी व स्थागुशाचे पथकाने त्वरीत तपासात गती देत परीसरातील सिसिटिव्ही फुटेजची पाहणी केली असता घटनेपुर्वी मयत हा एका अनोळखी व्यक्ती बरोबर मोर्शी अमरावती रोडने पायी जात असल्याचे दिसुन आले. यावरुन सदर इसमाचा परीसरात व आजुबाजूचे गावात शोध घेतला असता नमुद इसम हा दिनेश उर्फ गोलु भददु उईके वय २६ वर्ष रा. घोडगव्हान ता. मोर्शी येथील असल्याचे निष्पन्न झाले.त्यास ताब्यात घेतले असता त्याने सदर खुन केल्याची कबुली दिली आहे.



सदर आरोपी दिनेश उर्फ गोलु भददु उईके वय २० वर्ष  घोडगव्हाण ता. मोर्शी हा घटनेचे दिवशी दि २३  रोजी सांयकाळी अंदाजे ०९.३० वा चे दरम्यान मोर्शी येथे दारु पिण्याकरीता आला असता त्यानी नजर मृतक याचेवर पडली त्यानंतर त्याने मृतक यास भुलथापा देवुन मोर्शी येथील शिरभाने मंगल कार्यालय जवळील शेतशिवारात घेवुन गेला दरम्यानचे काळात त्याने मयत याचा मोबाईल फोन सुध्दा जवळ घेवुन घेतला होता. मयत आरोपीस वारंवार मोबाईलची मागणी करीत होता परंतु आरोपीने त्यास त्याचा मोबाईल परत न करता मयत यास अनैसर्गिक शरीर सुखाची मागणी केली त्यावर मयत याने नकार दिल्याने आरोपीने मयत याचे डोक्यावर मोठ्या दगडाने मारुन जख्मी केले मयत हा अर्धमृत अवस्थेत असतांना आरोपीने त्याचे सोबत अनैसर्गिक संभोग केला व त्यानंतर आरोपीने घाबरुन जावुन मयतास पुन्हा डोक्यावर दगडाने व शरीरावर फुटलेल्या काचेच्या शिशीने मारुन जिवे ठार केले. आरोपीस पुढील कायदेशीर कार्यवाही करीता पो.स्टे. मोर्शी याचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास मोर्शी पोलिस करीत आहे.



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक विशाल आंनद, अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलिस अधिकारी, मोर्शी संतोष खांडेकर, यांचे मार्गदर्शनात पो.नि. किरण वानखडे, नितीन देशमुख यांचे नेतृत्वात सहा. पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोउपनि सागर हटवार सह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पोलिस स्टेशन मोर्शी येथील अधिकारी अमलदार यानी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!