प्रवासात महीलेचे सोण्याचे दागिणे चोरणारी टोळी तळेगाव दशासर पोलिसांनी केली गजाआड…
देवगाव येथील चोरीचा गुन्हा उघड करण्यात तळेगाव दशासर पोलिसांना यश…..
तळेगाव दशासर(अमरावती) ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन तळेगाव दशासर येथे अप क्रं 54/2024 क. 379 भादवी अन्वये दि(27) रोजी फिर्यादी सौ. रेखा श्रीकृष्ण राऊत, वय 50 वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. देवगाव यांनी तक्रार दिली की, दि(20) रोजी धामणगाव ते देवगाव येथे ऑटोने प्रवास करत असताना त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले 27000/-रुपये कॅश व 07 ग्रॅम सोने (6 ग्रॅमची पोत व 1 ग्रॅम चा ओम) असे एकूण 57,000/₹ चा मुद्देमाल चोरी गेले बाबतचे रिपोर्टवरून पोस्टेला अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना धामणगाव ते देवगाव दरम्यानचे cctv चेक करून उपयुक्त फुटेजमधून आरोपींची ओळख पटवून आरोपीना ताब्यात घेतले २ आरोपींची पोलिस कोठडी घेऊन नगदी 20,000/₹ कॅश व सोनार प्रमोद भगत, शारदा ज्वेलर्स, धामणगाव रेल्वे यांच्या दुकानातून आरोपीने चोरीचे विकलेले 07 ग्रॅम सोने जप्त केले असून एकूण 55,000/-₹ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर गुन्ह्यात 04 आरोपी निष्पन्न झाले असून ते खालीलप्रमाणे आहेत.आरोपी क्र.
1) दिलीप नामदेव खत्री वय 30 व्यवसाय लोहारकाम राहणार राजनगाव तालुका धामणगाव रेल्वे
२) उद्धव लक्ष्मण चव्हाण वय 40 व्यवसाय लोहारकाम रा. धानोरा मोगल ता. चांदुर रेल्वे,
3) सौ. सावुबाई अंबादास सोळंके वय 63 वर्ष रा.फाळेगाव ता. बाबुळगाव जि. यवतमाळ
4) चोरीचा माल घेणारा सोनार प्रमोद रामाश्रय भगत, वय 40 वर्ष, व्यवसाय- शारदा ज्वेलर्स दुकान रा. धामणगाव रेल्वे जि. अमरावती.
सदरची कामगिरी ही पोलिस अधीक्षक विशाल आनंद,अप्पर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलिस अधिकारी आशित कांबळे, स्थागुशाचे पो निरीक्षक श्री किरण वानखेड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन तळेगाव (दशासर)चे ठानेदार सहा पोलिस निरीक्षक रामेश्वर धोंडगे,पोहवा पवन अलोने,सचिन गायधने
पोशि संदेश चव्हाण, गौतम गवळी,गौतम कांबळे,नामपोशि भाग्यश्री काळमेघ,चापोशि नरेश लोथे यांनी केली आहे.