घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखा भंडारा ची कारवाई
घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखा भंडारा ची कारवाई
भंडारा – गेल्या वर्षी म्हणजेच सन 2023 मध्ये कोथुर्णा टोली, भंडारा शहर, अड्याळ व लाखांदुर जवळील दोन गावात घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार हा पोलिसांना गुंगारा देत होता माञ शेवटी त्याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा चे पोलिस हवालदार अजय बारापात्रे, सतिश देशमुख, संदीप मते, नायक पोलिस शिपाई शैलेश बेदुरकर, बंडी मडावी, योगेश पेठे, आशीष तिवाडे, लक्ष्मी कापगते हे पेट्रोलींग करीत असताना संशयीतरित्या फिरत असलेला एक इसम आढळुन आला. त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गुरुदेव ऊर्फ मिरची खुशाल जांभुळे (वय 19 वर्ष), रा.जयदुर्गा नगर, भांडेवाडी, पारडी, नागपूर, ह.मु. घनशाम लिमजे यांचे घरी गांधी चौक भंडारा, जि.भंडारा असे सांगितल्याने त्याचेवर यापुर्वी नागपूर जिल्ह्यात मालमत्तेचे गुन्हे दाखल असल्याने पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे व पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात आरोपीस विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सन 2023 मध्ये कोथुर्णा टोली, भंडारा शहर, अड्याळ व लाखांदुर जवळील दोन गावात घरफोड्या केल्याचे कबुल केले.
सदर पोलिस स्टेशन च्या अभीलेखाची पाहणी केली असता (1) पो.स्टे. वरठी अप. क्र. 41/23 कलम 454, 380 भा. दं. वि, (2) पो. स्टे. भंडारा अप. क्र. 302/23 कलम 454, 457, 380 भा. दं. वि. (3) पो. स्टे. भंडारा अप. क्र. 618/23 कलम 457, 380 भा. दं. वि. (4) पो. स्टे. अड्याळ अप. क्र. 198/23 कलम 457, 380 भा. दं. वि, (5) पो. स्टे. लाखांदुर अप. क्र. 287/23 कलम 454, 457, 380 भा. दं. वि, असे पाच गुन्हे दाखल आहेत. सदर
गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 13 ग्रॅम सोने, घरगुती सामान व नगदी ₹ 1,000/- असा एकुण 45,600/- रु चा मुद्देमाल त्याच्या राहते घरातुन जप्त करुन आरोपी नामे गुरुदेव ऊर्फ मिरची खुशाल जांभुळे, (वय 19 वर्ष), रा.जय दुर्गा नगर, भांडेवाडी, पारडी, नागपूर, ह.मु. घनशाम लिमजे यांचे घरी गांधी चौक भंडारा यास पोलिस स्टेशन भंडारा च्या ताब्यात पुढील कारवाई करीता देण्यात आले आहे.
अशा प्रकारे सदरची कारवाई पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात वरील सर्व नमुद पोलीस अधिकारी व अमलदारांनी अथक परिश्रम व कौशल्यपुर्ण तपास करुन आरोपीस ताब्यात घेवुन भंडारा जिल्ह्यातील एकुण पाच गुन्ह्याची उकल केली आहे.