शहापुर राईस मिल चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने एकास ताब्यात घेऊन गुन्हा केला उघड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

राईस मिल चोरी प्रकरणातील आरोपीला भंडारा गुन्हे शाखेने केली अटक…

भंडारा (प्रतिनिधी) – भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने राईस मिल चोरी प्रकरणातील फरार आरोपीला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. नितेश उर्फ कार्लोस शिवनाथ बोरकर (वय २७ वर्ष) रा.भगतसिंग वार्ड, टाकडी ता.जि.भंडारा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी जवाहर नगर पोलिस ठाण्यात अप क्र.१५८/२०२४ कलम ४५७ आणि ३८० भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता





या बाबत अधिक माहिती अशी की, भंडारा जिल्हयात सतत वाढत्या घरफोडीचे प्रमाण पाहता पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर यांच्या नेतृत्वात स्थागुशा पथकांनी गोपनीय माहीतीच्या आधारे रेकार्डवरील गुन्हेगार नितेश उर्फ कार्लोस शिवनाथ बोरकर (वय २७ वर्ष) रा.भगतसिंग वार्ड, टाकडी ता.जि. भंडारा यास विचारपुस करुन त्याने पो.स्टे. जवाहरनगर येथील ग्राम शहापुर येथील राईस मिलमध्ये चोरी केल्याचे कबुल करुन पोलीस स्टेशन जवाहनगर अप क्रं. १५८/२०२४ कलम ४५७,३८० भादवि अन्वये गुन्हा उघडीस आणलेला आहे. एकंदरीत स्थागुशा पथकाने भंडारा जिल्हयातील सराईत आरोपी कडुन घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणले असुन गुन्हयात अधिक तपासा करीता पो.स्टे. जवाहरनगर यांच्या ताब्यात देण्यात आले.



सदरची कारवाई पोलिस अधिक्षक लोहीत मतानी, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, भंडारा डॉ.अशोक बागुल यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, पोहवा. गेंदलाल खैरे, नापोशि प्रफुल कठाणे, पोशिजगदिश श्रावणकर,मंगेश माळोदे, योगेश ढबाले (सर्व स्थागुशा भंडारा) यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!