
पवनी येथील वाळु तस्कर दिनेश उर्फ फिरोज याचेवर स्थानबध्दतेची कार्यवाही…
वाळु तस्कर’ दिनेश उर्फ फिरोज दशरथ सेलोकर याचेवर एमपीडीए कायद्यान्वये केली स्थानबध्दतेची कार्यवाही,भंडारा पोलिसांची चालु वर्षातील ९ वी कार्यवाही…
भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनेश उर्फ फिरोज दशरथ सेलोकर वय 27 वर्षे रा मांगली, ता. पवनी, जि. भंडारा हा पोलिस स्टेशन पवनी परीसरातील ग्राम मांगली येथील रहिवासी असुन त्याने स्वतःची वाळु तस्कर म्हणुन ओळख निर्माण केली आहे. दिनेश उर्फ फिरोज दशरथ सेलोकर हा सन 2019
पासुन वाळु तस्करीच्या व्यवसायात सक्रिय असुन त्याचेवर पोलिस ठाणे पवनी, अडयाळ येथे अवैध वाळु तस्करीचे 05 गुन्हे दाखल आहेत. त्याने त्याची एम. पी. डी. ए कायद्यान्वये वाळु तस्कर अशी
ओळख निर्माण केली होती. त्याचे अवैध वाळु तस्करीच्या व्यवसायामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत परीणाम व प्रभाव निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येऊन प्रचंड दहशत निर्माण झाली असल्याने अशा समाज विघातक व्यक्तीवर अंकुश बसविने गरजेचे होते. अशा सराईत गुन्हेगारास कायद्याचे कसोटीत बसवुन त्याचे गुन्हेगारीचा अस्त करणे हाच एकमेव पर्याय असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात दिनेश उर्फ फिरोज दशरथ सेलोकर तो पवनी तालुक्यात वाळु तस्कर असल्याने त्याचे विरुध्द पो.स्टे. पवनी येथे एम. पी. डी. ए. कायद्यान्वये प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यास दिनांक 10/04/2024 रोजी जिल्हाधिकारी, भंडारा श्री. योगेश कुंभेजकर यांचे आदेशाने ताब्यात घेऊन जिल्हा कारागृह भंडारा येथे दाखल करण्यात आले. यांनतर सुध्दा अशा धोकादायक व्यक्तींचा गुन्हे अभिलेख तपासुन एम. पी. डी. ए कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन दक्ष आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक लोहित मतानी,अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, मनोज सिडाम यांचे मार्गदर्शनात नितीनकुमार चिंचोळकर पोलिस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा भंडारा.), निलेश ब्राम्हणे पोलिस निरीक्षक, पो.स्टे. पवनी, पो.हवा. राजेश पंचबुधे, पो.हवा. अजय बारापात्रे, पो.ना. अंकोश पुराम, पो.शि अंजित वाहणे, पो.शि किशोर बुरडे, यांनी केली.




