
भंडारा स्थानिक गुन्हे शाखेची पवनी पोलिस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यावर धाड…
भंडारा- पोलिस अधीक्षक लोहीत मतानी यांनी भंडारा जिल्हा येथील कार्यभार स्वीकारल्यापासुन अवैध व्यवसायांवर धाडी घालुन अवैध व्यवसाय समुळ नष्ट करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने भंडारा जिल्हयातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असुन त्यांनी भंडारा जिल्हयातुन काढता पाय घेतला
आहे. तरीसुध्दा काही अवैध व्यवसाय करणारे व्यायसायीक लपुन छपुन अवैध व्यवसाय करीत असल्याने त्यांचेवर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक, भंडारा यांनी अधिनस्थ सर्व अधिकाऱ्यांना दिलेले आहेत.त्यानुसार दिनांक ०९/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांना
पवनी शहरात कोरंभी रोडवरील एका रेस्टारेंट मधे जुगाराचा अवैध अड्डा सुरु असल्याबाबत गोपनीय माहीती प्राप्त झाल्याने त्यांनी वेळीच स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस उपनिरीक्षक प्रिती कुळमेथे, पोलीस हवालदार तुळशिदास मोहरकर, विजय राउत, प्रशांत कुरंजेकर, पोलिस नाईक प्रफुल कठाणे, संदिप भानारकर, अंकोश पुराम, पोलिस शिपाई सुनील ठवकर यांचे पथक तयार करून सदर पथकास मिळालेल्या गोपनीय माहीतीप्रमाणे
कारवाई करण्याचे आदेशित केले. त्यावरुन सदर पथकाने वेळीच रवाना होवुन पोलिस स्टेशन पवनी येथील पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांना मिळालेली माहीती कळवुन नियोजनपूर्वक सापळा रचुन पवनी शहरातील कोरंभी रोडवरील त्र्यंबकराज रेस्टारेंट येथील दुसऱ्या माळयावर धाड घातली असता त्यात
१) सोनु उर्फ त्रिभुवन कोठीराम दंडारे वय ३० वर्ष रा. ताडेश्वर वार्ड पवनी,


२) नौशाद निजाम शेख वय ३० वर्ष रा. कोसरा,

३)विकास तुळशीराम घरडे वय ३१ वर्ष रा. शेळी/सोमनाळा

४) छगन दौलत कठाणे वय ३१ वर्ष रा. तई (बु.)
५)वैभव बाबुलाल नान्हे वय २८ वर्ष रा. अडयाळ
६) जागेश्वर बाबुराव राखडे वय ४६ वर्ष रा. ढोलसर
७) विकास ज्ञानेश्वर कांबळे वय ३५ वर्ष रा. ब्रम्ही
८) अरविंद प्रभु फुंडे वय ३२ वर्ष रा. तई (बु.)
९) सरफराज उर्फ सोनु ईब्राहीम खाँ पठाणे वय ३१ वर्ष रा. मासळ १०) रोहीत रविंद्र मेश्राम वय २२ वर्ष रा. लाखांदुर
११) तेजराम बळीराम कामथे वय २६ वर्ष रा. तई (बु.)
१२) रत्नहुस पुंडलिक कुंभरे वय २४ वर्ष रा. मासळ
१३) पियुष प्रेमदास गिऱ्हेपुंजे वय २० वर्ष रा. मोखारा
१४) बंटि उर्फ प्रणय जीवन काटेखाये वय २४ वर्ष रा. ब्रम्ही
१५) यश भारत तिमांडे वय २० वर्ष रा. ब्राम्हणी
१६) सुरज भाउराव नंदेश्वर रा. मांढळ
१७) पंकज अमृत नखाते वय ३४ वर्ष रा. मोखारा
१८) गणेश महादेव लांजेवार वय ४० वर्ष रा. ब्राम्हणी असे मिळुन तासपत्त्यांवर पैशाची बाजी लावुन जुगार खेळतानी मिळुन आले. पोलीसांनी त्यांचेकडुन ०१ चारचाकी वाहन, ०३ दुचाकी वाहन, १५
मोबाईल फोन, नगदि रक्कम ३८५९० /- रुपये, विदेशी मद्याच्या १८० मि.ली. च्या ४५ बॉटल कि. ७४१०/-रु तसेच जुगाराचे ईतर साहीत्य असा एकुण ०६,५८,८५०/- रु चा मुद्देमाल जप्त करून त्यांचेविरुध्द पोलिस स्टेशन पवनी येथे अप.क्र. ३८० / २०२३ कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार कायदा सहकलम ६५ (ई) महाराष्ट्र दारुबंदि कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस स्टेशन पवनी हे करीत आहेत.
सदरची कारवाई लोहीत मतानी, पोलिस अधीक्षक भंडारा, ईश्वर कातकडे, अपर पोलिस अधीक्षक भंडारा यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर, पोलिस उपनिरीक्षक प्रिती कुळमेथे, पोहवा तुळशिदास मोहरकर, विजय राउत, प्रशांत कुरंजेकर, पोलिस नाईक प्रफुल कठाणे, संदिप भानारकर, अंकोश पुराम, पोलिस शिपाई सुनील ठवकर स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा तसेच पोलीस निरीक्षक नरेन्द्र निस्वादे, पोलिस उपनिरीक्षक पठाण, पोहवा शिवणकर, पोना कुर्झकर पोलिस स्टेशन पवनी यांनी केलेली आहे.


