सातारा पोलीस दलाची धडाकेबाज कारवाई: वाई तालुक्यातील १.५५ कोटींच्या दरोड्यातील ८ आरोपी अवघ्या १२ तासांत जेरबंद!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


दिनांक १६ ऑक्टोबर २०२६:-  रोजी सकाळी ७:०० वाजेच्या सुमारास मार्क एक्सप्रेस कुरिअर कोल्हापूर कंपनीची महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH-09-FL-5423) पुण्यावरून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. खेड शिवापूर आणि कापूरहोळ परिसरातून ३ वेगवेगळ्या मोटारसायकलवरून आलेल्या ८ दरोडेखोरांनी कवठे (ता. वाई, जि. सातारा) गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वर सदर पिकअप गाडीचा पाठलाग करून तिची वाट अडवली.

दरोडेखोरांनी चालकाला कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली. त्यानंतर पिकअपचा मागील दरवाजा उघडून गाडीतील सोन्या-चांदीचे दागिने आणि चांदीच्या विटा असलेली पोती बळचोरी करून पसार झाले.



गुन्ह्याचा पर्दाफाश आणि तपास यंत्रणा:

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सातारा पोलीस अधीक्षक  निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी  विपुल पाटील व सुनील साळुंखे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.



स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून मालगाव (ता. व जि. सातारा) येथील संशयितांवर नजर ठेवली.



असा रचला होता दरोड्याचा कट:

तपासात निष्पन्न झाले की, आरोपींपैकी गोपीनाथ तानाजी कदम हा कराड येथील कुरिअर कंपनीत कामाला होता. त्याला पिकअप गाड्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळांची व त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने असल्याची पूर्वकल्पना होती. त्याने ही माहिती मंगेश एकनाथ जाधव याला दिली.

पोलिसांची उल्लेखनिय कामगिरी: 



गोपीनाथ कदम, मंगेश जाधव, ऋतिक कदम, आदित्य कदम, सोमनाथ गोडसे, निखिल कदम, अक्षय मोझर (सर्व रा. मालगाव) आणि निषीध साबळे (रा. शिवथर) यांनी मिळून हा धाडसी दरोडा प्लॅन केला. त्यांनी तीन वेगवेगळ्या मोटारसायकलवरून खेड शिवापूर टोलनाक्यापासून पिकअपचा पाठलाग केला आणि वाई हद्दीत गाडी अडवून दरोडा टाकला.सातारा स्थानिक गुन्हे शाखा, भुईंज व वाठार पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्रफरकवत अवघ्या १२ तासांच्या आत या संपूर्ण गुन्ह्याचा छडा लावला. पोलिसांनी सर्व ८ आरोपींना बेड्या ठोकून त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ५५ लाख २७ हजार २५८ रुपयांचा पूर्णच्या पूर्ण मुद्देमाल यशस्वीरित्या हस्तगत केला आहे. या धडाकेबाज कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संपूर्ण तपास पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!