मध्य प्रदेशातील आंतरराज्यीय दुचाकी चोरटी टोळी जेरबंद; चांदूर बाजार पोलिसांची धडक कारवाई!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


८.५० लाख रुपयांच्या ८ चोरीच्या गाड्या जप्त; २ जण ताब्यात, एक फरार

अमरावती (चांदूर बाजार):

चांदूर बाजार पोलिसांनी धडक कारवाई करत मध्य प्रदेशातून दुचाकींची चोरी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ८ लाख ५० हजार रुपये किमतीच्या एक-दोन नव्हे, तर तब्बल ८ चोरीच्या दुचाकी जप्त करत आरोपींना गजाआड केले आहे.



घटनेची पार्श्वभूमी: घरापुढून बुलेटची चोरी

शिरजगाव अर्डक येथील रहिवासी गजानन वैकुंठराव वानखडे (वय ३२) यांची हिरव्या रंगाची ‘रॉयल इनफिल्ड क्लासिक ३५०’ (क्र. MH 27 ED 8022, किंमत २,२०,००० रुपये) ही दुचाकी २२ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांच्या घरापुढून अज्ञात चोरट्याने लांबवली होती. याप्रकरणी चांदूर बाजार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दाखल करण्यात आला होता.



मध्य प्रदेशातील बस स्थानकावर रचला सापळा

अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यात चोरी गेलेल्या दुचाकींचा शोध घेण्याचे कडक निर्देश दिले होते. दरम्यान, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलिसांच्या गुप्त बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली की, चांदूर बाजार येथून चोरी केलेली गाडी विकण्यासाठी एक संशयित मध्य प्रदेशातील आठनेर येथील ‘मोसा छोटा’ बस स्टँडवर येणार आहे.



माहिती मिळताच पोलीस पथकाने तातडीने तेथे जाऊन सापळा रचला. बिना नंबरची ‘सुपर स्लेंडर’ घेऊन आलेल्या एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी सखोल आणि खाकीचा धाक दाखवून विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली.

आरोपींची माहिती:

  • संतोष गुलाब उईके (वय २७ वर्षे) – रा. रडगाव, ता. आठनेर, जि. बैतुल (मध्य प्रदेश) (अटक)



    एक विधिसंघर्षित बालक (ताब्यात)

    सुभाष भलावी – रा. सातकुंड (मध्य प्रदेश) (फरार)



    जप्त केलेला मुद्देमाल (एकूण किंमत: ₹८,५०,०००/-)

आरोपींनी चांदूर बाजार, शिरखेड आणि सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेल्या एकूण ८ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत:

अ.क्र. वाहनाचा प्रकार संख्या
०१ रॉयल इनफिल्ड बुलेट

०१

०२ बजाज पल्सर

०२

०३ होंडा शाईन

०२

०४ हिरो स्लेंडर

०३

तपास अधिकारी व पोलीस पथक

ही यशस्वी कारवाई अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  निकेतन कदम (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक  दत्ता तोटेवाड, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी  माधवराव गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

प्रत्यक्ष कारवाई पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या नेतृत्वात अंमलदार रविंद्र बावणे, आशिष राऊत, जितेश सावारकर, व वैभव आकोटकर यांच्या पथकाने पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास चांदूर बाजार पोलीस करत आहेत.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!