
अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल विक्री करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
जळगाव(जामोद)बुलढाणा प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की
मध्यप्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या पोलिस स्टेशन जळगांव जामोद हददीमध्ये काही ईसम देशी कटटयांची खरेदी विक्री करणार आहेत. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यावरुन सुनिल कडासने पोलिस अधीक्षक बुलढाणा, अशोक थोरात- अपर पोलिस अधीक्षक खामगांव, देवराम गवळी-उपविभागीय पोलिस अधिकारी-मलकापूर यांचे मार्गदर्शनाखाली,
अशोक लांडे पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांचे आदेश व नेतृत्वामध्ये दि. 24/11/2023 रोजी पो.स्टे. जळगांव
जामोद हददीतील गोराळा धरणाचे जवळ यातील खाली नमुद 04 आरोपी यांना देशी कट्ट्यांची (पिस्टल) खरेदी-विक्री व्यवहार चालु
असतांना छापा टाकून पकडण्यात आले. तर घटनास्थळावरुन ईतर 04 आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
कारवाईमध्ये पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे:
1. मोहम्मद अख्तर शेख मुश्ताक वय 31 वर्ष रा. वाशिम बायपास, अंबिकानगर, अकोला
2. फहदखान फारुखखान वय 27 वर्ष रा.744/76 भवानीपेठ, पुणे
3. तौसिफ करीमखान वय 34 वर्ष रा.312 रविवारपेठ, शंका ज्वेलर्सजवळ, पुणे
4. रामसिंग भवानसिंग मुझाल्दा वय 26 वर्ष रा. निमखेडी ता.. जळगाव जामोद जि. बुलढाणा
+ 04 फरार आरोपी
आरोपींकडून खालीलप्रमाणे मुददेमाल जप्त करण्यात आला
1. एक पिस्टल किं. अं. 30,000/- रु
2. 07 नग जिवंत काडतूस (राउंड) किं. अं. 3500/- रु
3. एक ईन्वोव्हा कार MH-02-AY-8213 किं. अं. 12,00,000/-रु
4.एक हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटार सायकल किं. अं. 15,000/रु
5. एक पल्सर मोटार सायकल किं. अं. 1,00,000/-रु
6.06 नग मोबाईल फोन किं. अं. 55,000/- रु
पिस्टल, राऊंड, इनोव्हा कार, मोटार सायकल व मोबाईल असा एकूण 14,03,500/-रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अकोला येथील एका आरोपीच्या मध्यस्थीने पुणे येथील दोन आरोपी जळगांव जामोद येथे देशी कटटा विकत घेण्यासाठी आले. पो.स्टे. जळगांव जामोद हददीतील गोडाळा डॅम येथे यातील आरोपी देशी बनावटीचे अग्निशस्त्र (पिस्टल) खरेदी-विक्रीचा व्यवहार चालु असतांना स्था.गु.शाखेच्या पथकाने छापा टाकुन त्यांना पकडले.
सदरची कामगिरी ही सुनिल कडासने पोलिस अधीक्षक, बुलडाणा, अशोक थोरात – अपर पोलिस अधीक्षक खामगांव, देवराम गवळी- उपविभागीय पोलिस अधिकारी मलकापूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक एन लांडे प्रभारी अधिकारी स्था.गु.शा. बुलढाणा यांच्या नेतृत्वात विलासकुमार सानप सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस अंमलदार दिपक लेकुरवाळे, गणेश पाटील, पुरूषोत्तम आघाव, गजानन गोरले, चालक पोकॉ विलास भोसले, सायबर पो.स्टे. चे राजु आडवे यांनी केली.




