जितेंद्र आव्हाड यांच्यासह २२ जणांवर गुन्हे दाखल…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

जितेंद्र आव्हाड यांच्यासह २२ जणांवर गुन्हे दाखल…

रायगड (प्रतिनिधी) – महाड आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्या चांगलच अंगलट आले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या महाड आंदोलनादरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. महाडच्या आंदोलनाचे वेळी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृती असं लिहिलेले फोटो आणले होते. मनुस्मृती फाडण्याचे आंदोलन करत असताना आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरांचे फोटो फाडले. या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आज (दि.२९एप्रिल) रोजी विधानसभा सदस्य डॉ.जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी क्रांतीस्तंभ, महाड येथे मनुस्मृती दहनाचे आंदोलन केले. सदर आंदोलनामध्ये जिल्हा दंडाधिकारी, रायगड-अलिबाग यांचे कलम ३७ (१) (३) नुसार जमावबंदी विषयी लागु असलेल्या निषेध आज्ञांचे उल्लंघन केले म्हणुन डॉ.जितेंद्र आव्हाड व अन्य २२ कार्यकर्ते यांचे विरूध्द महाड शहर पोलीस ठाणे कॉ.गु.र.नं. १००/२०२४ भादवि कलम १८८ व मुंबई पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.



त्याच प्रमाणे आंदोलना दरम्यान डॉ.जितेंद्र आव्हाड व त्यांचे चबुत-यावर उभे असलेले ७ ते ८ आंदोलक यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडले व बौध्द धर्मीयांच्या तसेच अनुसूचित जातीच्या लोकांच्या भावना दुखविल्या म्हणुन त्यांचे विरूध्द महाड शहर पोलीस ठाणे कॉ.गु.र.नं. १०१/२०२४ भादवि २९५ (अ), ३४ व अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (१) (टी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!