चंद्रपूर घरफोडी: छत्तीसगडमधून चोरट्याला अटक; ३ लाखांची रोकड जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

चंद्रपूर: बसस्थानक परिसरातील ६ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; छत्तीसगडमधून आरोपी जेरबंद, ३ लाखांची रोकड जप्त

स्थानिक गुन्हे शाखा (LCB), चंद्रपूर यांनी धडक कारवाई करत शहरातील बसस्टँड परिसरातील एका कार्यालयातून ६ लाख रुपयांची रोख रक्कम लंपास करणाऱ्या आरोपीला छत्तीसगड राज्यातून अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या रकमेपैकी ३ लाख रुपयांची रोकड यशस्वीरीत्या जप्त केली आहे.

  • कार्यालयातून ६ लाखांची चोरी:



    डी.एस.के. ग्रीन कॉलनी, दाताळा (चंद्रपूर) येथील रहिवासी फिर्यादी सौ. राकेश अवघडे (वय ४४ वर्ष) यांचे बस स्थानकाजवळ, पॅलेस हॉटेलच्या मागे कार्यालय आहे. दि. २७ जुलै २०२६ रोजी अज्ञात चोरट्याने या कार्यालयात प्रवेश करून ₹६,००,०००/- रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद (अप. क्र. ९५६/२०२६, कलम ३३१ (४) भारतीय न्याय संहिता, २०२३) करण्यात आला होता.

  • छत्तीसगडमधून आरोपीला ठोकल्या बेड्या:



    गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी विशेष पथक स्थापन केले. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि कौशल्याच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी वलेश कुमार हल्बा उर्फ बुवारिया (वय ३८ वर्ष, रा. रेंगाकठेरा, पोस्ट डोंगरगाव, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) याला छत्तीसगडमधून ताब्यात घेतले.

  • कबुलीजबाब आणि रोकड जप्त:



    पोलीस पथकाने कसून चौकशी केली असता आरोपीने चोरीची स्पष्ट कबुली दिली. आरोपीच्या कबुलीजबाबावरून पंचांसमक्ष त्याच्याकडून ₹३,००,०००/- (तीन लाख रुपये) रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. उर्वरित ३ लाख रुपयांचा शोध पोलीस घेत असून आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी रामनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

तपास पथक:

पोलीस अधीक्षक  आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक  ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.



  • नेतृत्व: पोलीस निरीक्षक  अमोल काचोरे

  • विशेष पथक: सपोनि योगेश हिवसे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकर, पोहवा सतीश आवठारे, पोहवा इम्रान खान, पोहवा लालू यादव, पोहवा संदीप, पोहवा हिरालाल गुप्ता, पोअं. किशोर वाकडे व पोअं. शशांक बदाम.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!