चंद्रपुर जटपुरा गेट परीसरात झालेल्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

चंद्रपुर – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०६/१०/२०२३ रोजी फिर्यादी वर्षा संजय गोडे वय ५० वर्ष रा विश्वभारती हॉटेलमागे
सराई वार्ड चंद्रपुर, जिल्हा चंद्रपुर या आपल्या घरी झोपुन असतांना त्यांचे पती हे घराचा दरवाजा बाहेरुन लावून बाहेर फिरायला गेले असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीचे राहते घराचे आत प्रवेश करून घराचे हॉलमधील बॅगमध्ये ठेवलेले २,१४,०००/- रू. किंमतीचे सोन्या-चांदिचे दागिने चोरून नेले अशा फिर्यादीवरून पोलिस स्टेशन रामनगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला. होता
चंद्रपुर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत होणान्या घरफोड्या लक्षात घेवून पोलिस अधिक्षक, चंद्रपूर, अपर पोलिस अधिक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.
महेश कोंडावार यांनी विशेष पथक नेमून सदर घरफोडीचा छडा लावण्याचे निर्देश दिले. सदर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी कौशल्यपुर्ण तपास करून गोपनिय बातमीदारांमार्फत माहिती घेवून रेकॉर्डवरील आरोपी

उमाकांत ऊर्फ गोलु सुनिल उदासी, वय २३ वर्ष, रा. संजय मोहल्ला, जलनगर चंद्रपुर





यास ताब्यात घेवून सखोल विचारपूस केली असता आरोपीने वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर आरोपीकडून गुन्ह्यातील सोन्या-चांदीचे दागीने असा १,९७,५००/- रू. चा मुद्देमाल  हस्तगत
करण्यात आला. अशा प्रकारे सदर गुन्ह्याचा कौशल्यपुर्ण तपास करून गुन्हा उघडकीस आणला



सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक रविंद्रसिंग  परदेशी, अपर पोलिस अधिक्षक रीना जनबंधु, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे
शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, पोउपनि, विनोद भुरले, पोहवा. संजय आतकुलवार, पोशि, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, अपर्णा मानकर यांनी केली असून आरोपीस पुढिल तपासकामी पोलिस स्टेशन, रामनगर येथे ताब्यात देण्यात आले. आहे







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!