खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्याला गुन्हे शाखेने केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्याला गुन्हे शाखेने केली अटक…

नाशिक शहर (प्रतिनिधी) – पिस्तूलाचा धाक दाखवित व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी प्रकरणातील मुख्य सुत्रधार शिव नेहरकर उर्फ चिक्कु व त्याच्या साथीदारांना पोलीसांनी शिर्डीतील साईबाबा मंदिराजवळून अटक केली आहे. या टोळीतील तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधारासह त्याचा साथी-दार घटनेनंतर फरार होता. ही कारवाई नाशिक गुन्हे शाखेचे विशेष पथक व शिर्डी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने केली आहे.





या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशेष पथकाचे पोउपनि. मुक्तेश्वर लाड व पोअं. भगवान जाधव, पोना. भुषण सोनवणे, हे शहरात गस्त करत असतांना त्यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, म्हसरूल पोलीस ठाणे गु.र.नं 54/2024, कलम 363,364,386,387,395 भादवि सह कलम 3/25 शस्त्र अधिनियम मधील 20 लाख रूपयांच्या खंडणीसाठी शहरातील व्यापाऱ्याचे अपहरण करून त्यास मध्यप्रदेशात घेऊन जाऊन 10 लाख रूपयें खंडणी घेणाऱ्या टोळीतील, फरार असलेला मुख्य सुत्रधार व त्यांचा साथीदार आरोपी शिर्डी येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यावरुन सदरची माहिती संदिप मिटके सपोआ. गुन्हे यांना देण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक शिर्डी येथे रवाना झाले तसेच शिर्डी पोलिसांच्या मदतीने गुप्त बातमीतील आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे साई मंदिराच्या पाठीमागे पालखी रोडवरील हॉटेल साई संजय येथे आल्याची माहिती मिळताच पथकाने शिर्डी पोलीसांच्या मदतीने वर नमुद गुन्ह्यातील पाहिजे आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारपुस करता त्यांनी त्यांचे नावे 1) शिवा रविंद्र नेहरकर, (वय 23 वर्ष), रा.महाजन यांच्या घरात किरायाने, नंदनवन चौक, श्रीस्वामी समर्थ केंद्रा जवल, उत्तम नगर, सिडको, नाशिक, 2) शुभम नानासाहेब खरात, (वय 25 वर्ष), रा.संतोषी माता नगर, सयोग रबर कंपणीच्या पाठिमागे, सातपुर MIDC, नाशिक आरोपी असे सांगीतले त्यांना ताब्यात घेऊन विचारपुस करता वर नमुद गुन्हा केल्यांची कबुली देऊन, गुन्हा केल्यापासुन फरार झाल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासकामी म्हसरूल पोलीस ठाणेच्या ताब्यात दिले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुख्य सुत्रधार शिव नेहरकर उर्फ चिक्कु हा असुन तो गुप्ता यांचे दुकानात कामाला होता, शिव यानेच त्यांच्या मित्रांच्या मदतीने अपहरणाचा कट रचला होता.



अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त संदिप कर्णिक पोलिस उपाआयुक्त(गुन्हे), प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त गुन्हे संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि ज्ञानेश्वर मोहिते, पोउपनि मुक्तेश्वर लाड, पोउनि दिलीप भोई, पोहवा किशोर रोकडे,नापोशि दत्ता चकोर, रविंद्र दिघे, भुषण सोनवणे,पोशि भगवान जाधव, अनिरूद्ध येवले, सर्व नेमणुक विशेष पथक गुन्हे शाखा, नाशिक यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!