पोलिस अधिक्षकाचे विशेष पथकाचा जुगार अड्डयावर छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाने पोलिस स्टेशन फर्दापुर हद्दीत जुगार अड्डयावर छापा टाकून 07 आरोपीसह  6,28,440/-रु चा  मुद्देमाल केला जप्त……

छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांचे आदेशाने जिल्हयात चोरटया मार्गाने सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाईचे धाडसत्र सुरू असुन जिल्हयातील दुर्गम भागातील शेतामध्ये छुप्यामार्गाने चालणा-या जुगार अड्यांची गोपनीय माहिती काढुन त्यांचेवर पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकांद्वारे छापेमारी करून गुन्हे दाखल करण्यात येत आहे..





याअनुषंगाने  पोलिस अधीक्षक यांचे विशेष पथकास दि(3) रोजी माहिती मिळाली कि, पोलिस ठाणे फर्दापुर हद्दीतील फर्दापुर शिवारातील रवि माणिक देवकर यांचे शेतात असलेल्या पत्र्याचे शेड मध्ये काही ईसम हे बल्बच्या उजेडात जुगार खेळत व खेळवित आहे अशी माहिती मिळाली होती.यावरून पथकाने कारवाईच्या अनुषंगाने शेताचे संपूर्ण परिसराची बारकाईने व छुप्या पध्दतीने पाहणी केली असता तेथे 9 ते 10 मोटरसायकल या उभ्या असलेला दिसुन आल्या तसेच शेतातील पत्राचे शेड छोटया बल्चच्या उजेडात काही व्यक्तींची संशयीत हालचाल नजरेस पडली. यावरुन सापळा लावुन छापा मारण्याचे नियोजन केल्यानुसार पोलिसांचे पथकांनी रात्री अंदाजे 10:30 वा चे सुमारास रात्रीच्या अंधारात पथकांने लपत छपत जावुन अचानक शेतातील पत्र्याचे शेडला घेराव टाकुन छापा टाकला असला, काही ईसम हे पत्यावर तिर्रट व झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळतांना दिसुन आले. पोलिसांनी अचानक झडप घालुन कारवाई केल्याने जुगारी ईसमांची धांदल उडाली व यातील काही ईसम हे अंधाराचा फायद्या घेवुन शेतातील बंधा-याने मिळेल त्या रस्त्याने सैरावैर पळत सुटले परंतु तरीही पथकातील पोलिसांनी त्यांचा अंधारात पाठलाग करून त्यांतील 07 जुगा-यांना ताब्यात घेतले आहे.



यामध्ये 1) गणेश जगन्नाथ गांवडे वय 34 वर्षे (जुगार अड्डा चालविणारा) 2) दिपक राजु काकडे वय 34 वर्षे 3) गफार गुलाव पठाण वय 39 वर्षे 4) शेख आरिफ शेख हुसैन वय 29 वर्षे 5)दिपक जनार्धन पवार वय 29 वर्षे 6) गणेश शेषराव सावळे वय 34 वर्षे 7) अनिल देविदास वाघ वय 33 वर्षे सर्व रा. फर्दापुर ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश आहे



नमुद कारवाई मध्ये रोख 88,440/- रुपयांसह 09 दुचाकी वाहने, 04 मोबाईल फोन, पत्याचे कॅट, इतर जुगाराचे साहित्य असे एकुण 6,28,440/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन नमुद आरोपीविरुध्द पोलिस ठाणे फर्दापुर येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस ठाणे फर्दापुर हे करित आहेत.

सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया, यांचे विशेष पथकातील स.पो.नि. सुदाम सिरसाठ, पोलिस शिपाई नवनाथ कोल्हे, रामेश्वर धापस, गणेश सोनवणे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!