
देवलापार पोलिसांची कारवाई: १०.२८ लाखांच्या मुद्देमालासह विदेशी दारू जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
देवलापार पोलिसांची मोठी कारवाई: १० लाख २८ हजार ३२० रुपयांच्या मुद्देमालासह विनापरवाना विदेशी दारू जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
देवलापार: विनापरवाना आणि अवैध रित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना देवलापार पोलिसांनी रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून एकूण १० लाख २८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी १ जुलै २०२६ रोजी देवलापार पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, एका कारमधून अवैध रित्या दारूची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने जुने देवलापार पोलीस स्टेशन समोर नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान संशयास्पद वाटणारी एक ‘स्विफ्ट कार’ (क्रमांक: MH-32/AX 5997) पोलिसांना मिळून आली.
लाखोंचा मुद्देमाल जप्त वाहनाला थांबवून पंचांसमक्ष त्याची पाहणी केली असता, कारमध्ये खाकी रंगाच्या खोक्यांमध्ये ‘ऑफिसर्स चॉईस’ (Officers Choice) कंपनीची विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

-
विदेशी दारू: ‘ऑफिसर्स चॉईस’ कंपनीच्या १९२० निपा (किंमत ₹३,२८,३२०/-)
-
वाहन: स्विफ्ट कार क्र. MH-32/AX 5997 (किंमत ₹७,००,०००/-)

-
एकूण जप्त मुद्देमाल: ₹१०,२८,३२०/- (दहा लाख अठ्ठावीस हजार तीनशे वीस रुपये)
अटक करण्यात आलेले आरोपी अवैध रित्या दारूची वाहतूक करताना पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे:

१) तुषार प्रभाकर बदलमवार (वय ३० वर्ष, रा. बेलगाव, पोस्ट झडगाव, ता. जि. वर्धा; सध्या मुक्काम: रामनगर सिंधी मेघे, ता. जि. वर्धा)
२) रूपेश शिवदास कांबळे (वय २५ वर्ष, रा. थूल ले आऊट, भिमवाडी सिंधी मेघे, ता. जि. वर्धा)
या दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन देवलापार येथे ‘महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम’ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.




