
पोलिस अधिक्षकांच्या पथकाने उमरगा पोलिस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यावर टाकली धाड…
धाराशिव – अतुल कुलकर्णी, पोलिस अधिक्षक धाराशिव, यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार त्यांचे आदेशाने व नवनीत कॉवत अपर पोलिस अधिक्षक, धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून कार्यवाही करनेकामी दि.23.09.2023 रोजी पोस्टे उमरगा हद्दीतील जकेकुर शिवार येथे आल्यावर जकेकुर शिवार येथील चौधरी कॉलनी येथे बाळु तुकाराम् शिंदे यांचे घराचे वरच्या मजल्यावरील एका खोलीत काही इसम तिरट नावाचे जुगार खेळत व खेळवित आहे सदर ठिकाणी १०.४५ वा. सुमारास छापा मारला असता सदर ठिकाणी मिळून आलेले इसम नामे
1) विक्रम भानुदास माने,


2)जितेंद्र ज्ञानोबा काळे,

3) अमोल विठ्ठल जाधव,

4 ) हितेन हरीलाल पटेल,
5 ) अजित जिलानी उस्ताद,
6) काका देविदास गायकवाड,
7) अमोल किसन माने,
8) बालाजी बाबुराव गायकवाड,
9) ऋषी किशोर जाधव,
10) तानाजी नागोराव गाडे,
11) राम किसन तोरंबे,
12) विलास रंगनाथ जाधव,
13 ) नागेश राम पवार,
14) राहुल धनु राठोड,
15) सचिन गायकवाड,
16)शरद मारेकर
हे सर्व लोक तिरट जुगार खेळत असताना पथकास मिळुन आले. नमूद जुगार अड्डयावरुन तिरट जुगाराचे साहित्यासह 12 मोबाईल फोन, 3 मोटरसायकल व रोख रक्कम असा एकुण 2,28,355 ₹ किं चा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 4,5 अंतर्गत उमरंगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
सदरची कामगिरी.पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर
पोलिस अधीक्षीक नवनीत कॉवत यांच्या आदेशावरुन उमरगा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पारेकर, सपोनि भराटे, पोलिस नियंत्रण कक्षाचे सपोनि तिगोटे, पोलिस नियंत्रण कक्ष व उमरगा पोलिस ठाणे अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.


