कळंब पोलिसांची शेतशिवारात गांजाची झाडे लावुन संवर्धन करणाऱ्या वर कार्यवाही.६०लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

कळंब(धाराशिव)प्रतिक भोसले – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक ०४/११/२०२३ रोजी कळंब पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक, सुरेश साबळे यांना गोपनिय माहीती मिळाली की, इटकुर ता. कळंब जि. धाराशिव येथे एका इसमाने त्याचे शेतात स्वता:च्या आर्थीक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशिररित्या गांज्याच्या झाडांची लागवड करुन त्याचे संवर्धन व जोपासना करीत आहे, अशी खात्रीलायक माहीती मिळाल्याने याबाबत पोलिस अधीक्षक अतुल  कुलकर्णी ,अपरसपोलिस अधीक्षक  नवनीत काँवत  व उपविभागीय पोलिस अधिकारी  एम रमेश साहेब उप विभाग
कळंब यांना रेड बाबत माहीती देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करणे कामी कळंब तहसील कार्यालयाचे सक्षम अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांना माहीती देवून शासकीय पंचासह माहीतीच्या ठिकाणी छापा मारला असता, इटकुर शिवारात शेत गट नं १२०१ मध्ये शेतकरी – दशरथ संपती काळे रा. इटकूर याने मकाच्या शेतात अवैध गांज्याचे झाडे लावुन त्याचे संवर्धन करीत असताना मिळुन आला.त्याचे शेतातुन एकुण ५०० किलो ५०० ग्रॅम वजनाची ओलसर गांज्याची झाडे एकुण किंमत
६०,०६,०००/- ( साठ लाख सहा हजार रुपये) चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर शेतकरी यांचे विरुध्द कळंब पोलीस स्टेशन येथे गुरनं ४७६ / २०२३ कलम २० एन.डी.पी.एस. कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक  अतुल कुलकर्णी , अपर पोलिस अधीक्षक नवनीत  काँवत , उपविभागीय पोलिस अधीकारी  एम रमेश साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक  सुरेश साबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश पाटील, हनुमंत कांबळे, पोहवा सुनिल कोळेकर, बाळासाहेब तांबडे, चालक पोहवा पांडुरंग माने, पोना दत्तात्रय शिंदे, अजिज शेख, शिवाजी राऊत, मपोना सविता कांबळे, पोशि भरत गायकवाड, करीम शेख, वैजिनाथ मोहीते, फुलचंद मुंढे, रणजित लांडगे, मपोअं/रोहीणी चव्हाण, चालक पोशि परमेश्वर मगनाळे यांचे पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!