धुळे शहर पोलिसांची गांजाची अवैध वाहतुक करणाऱ्या वर कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

धुळे शहर पोलिसांनी पकडला ईंदोर येथुन मुंबई येथे जाणारा गांजांचा साठा…





धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,काल दि.(२८) रोजी सकाळी ११.०० वा चे सुमारास धुळे शहर पोलिस स्टेशनचे
पोशि महेश मोरे, मनिष सोनगिरे, प्रविण पाटील यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली आहे की, आज दि रोजी मध्यप्रदेश राज्यातुन मारुती सुझुकी सियाज कंपनीची गाडी क्रमांक MH ०५/CV-३८४६ हीचेतुन धुळे मार्गे मुंबईकडे मानवी मेंदुवर विपरीत परिणाम घडवुन आणणाऱ्या गांजाची विक्री करण्यासाठी चोरटी वाहतुक होणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलिस निरीक्षक  धिरज महाजन यांनी पोलिस अधीक्षक, श्रीकांत
धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे व सहा.पोलिस अधीक्षक,ऋुषीकेश रेडडी यांचे मार्गदर्शन व पूर्व परवानगीने दोन पथके तयार करुन पहिल्या पथकात पोलिस निरीक्षक  धिरज महाजन व परि.पोउपनि गणेश दत्तात्रय आघाव शोध पथकातील पोहवा विजय शिरसाठ,पोशि महेश मोरे,मनिष सोनगिरे, कुंदन पटाईत,प्रविण पाटील,तुषार पारधी, वसंत कोकणी व दुसऱ्या पथकात पोउपनि प्रशांत राठोड, पोहवा दिनेश परदेशी, पोहवा सचिन
गोमसाळे ,नापोशि रविंद्र गिरासे,पोशि अमोल पगारे, शाकीर शेख अमित रनमळे यांनी दिनांक २८/०३/ २०२४ रोजी ४.०० वाजता धुळे शहरातुन इंदौर मध्यप्रदेश कडून मुंबई कडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रं. ३ वर धुळे शहराजवळील हॉटेल देश विदेश जवळील साक्री कडे जाणाऱ्या रस्त्यावर हॉटेल भंडारा समोरील स्पीड ब्रेकरवर आरोपी नामे असीफ नफीस अन्सारी, वय २७ वर्ष, व्यवसाय- ड्रायव्हींग व गाडी मालक, राहणार फॉरेस्ट ऑफीस जवळ गोलविरा बेहुर, रमजान चाळ मधील पहिली खोली, पालघर, ता.जि.पालघर व त्याचा साथीदार नामे अनिल बाबु पवार, वय ३४ वर्ष, व्यवसाय-रिक्षा चालक, राहणार भोईसर भैय्यापाडा, ता.जि.पालघर यांनी मध्यप्रदेश राज्यातुन २,१३०००/- रु.कि.चा एकुण २१ किलो ३०० ग्रॅम वजनाचा मानवी मेंदुवर विपरीत परिणाम करणारा हिरवट रंगाचा कडवट उग्र वासाचा ओला, कोरडा पान, फुल बी व देठांसह गांजा सदृश्य पदार्थ हा आसीफ नफीस अन्सारी हा स्वत:चे मालकीची ४००, ०००/- रुपये किंमतीची ब्राऊन रंगाची मारोती सुझकी कं.ची सियांज मॉडेलची MH ०५/CV-३८४६ हीचेतुन विक्री करण्याचे
उद्देशाने गांजाच्या वाहतुक करतांना सापळा रचुन पकडण्यात येवुन छापा कारवाईत एकुण ६,३६,०००/- रुपये किमंती मुददेमाल हस्तगत करण्यात आले आहे. पुढील तपास हा  पो.नि. धिरज महाजन हे स्वतः करीत आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे,  अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे व सहा पोलिस अधीक्षक, ऋुषीकेश रेड्डी  यांचे मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलिस ठाणे चे पहिल्या पथकात पोलिस निरीक्षक  धिरज महाजन,पोउपनि प्रशांत राठोड,गणेश आघाव,पोहवा विजय शिरसाठ,पोशि महेश मोरे,मनिष सोनगिरे, प्रविण पाटील,वसंत कोकणी,रविंद्र गिरासे,कुंदन पटाईत,तुषार पारधी चापोशि शाईद शेख,केतन पाटील व दुसऱ्या पथकातील
पोहवा दिनेश परदेशी,सचिन गोमसाळे,पोशि  अमोल पगारे,शाकीर शेख,अमित रनमळे अशांनी मिळून केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!