देसाईगंज(गडचिरोली)पोलिसांनी केला २३ लक्ष रु किंमतीचा गुटखा जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

देसाईगंज(गडचिरोली)- जिल्हयात अवैध सुगंधीत तंबाखु तस्करी व इतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी कठोर कार्यवाहीचे निर्देश सर्व पोस्टे/उप-पोस्टे/पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले होते त्यानुसार

आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आज दिनांक 11/09/2023 रोजी अवैद्यरित्या प्रतिबंधीत सुगंधित तंबाखुची वाहतुक होणार आहे. अशी खबर पोलिस शिपाई राहुल ढोके पोस्टे देसाईगंज यांना मिळाल्याने पोलिस निरीक्षक रासकर पोलिस स्टेशन देसाईगंज यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, पोलिस अंमलदार राऊत, ढोके सराटे,कुमोटी असे सापळा रचुन ईसम





1) आशिष अशोक मुळे, वय 30 वर्ष, रा. खरबी, पोस्टे खेड, ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपुर



2) अतुल देविदास सिंधीमेश्राम, वय – 29 वर्ष, रा. भवानी वार्ड ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपुर



यास पकडले व त्याचे ताब्यातुन 1) लाल रंगाची टाटा कंपनीची आयशर वाहन क्र. एमएच 40 सिएम 6552 कि. अंदाजे. 10,000/- रुपये 2) 24 नग मोठ्यी  पांढ­या रंगाचे प्लॅस्टीकच्या चुंगळीमधे प्रत्येकी 6 नग पांढ­या रंगाचे कट्टे व त्या प्रत्येक कट्ट्यामधे 11 नग पॅकेट व त्यावर ईगल हुक्का शिशा तंबाखु असे लिहिलेल्या प्रत्येक पॉकेटची किंमत 640 रुपये असे एकुण 10, 13,760/- रुपये 3) 21 नग मोठ¬ा हिरव्या रंगाचे प्लॅस्टीकच्या चुंगळीमध्ये प्रत्येकी 4 नग पांढ­या रंगाचे कट्टे व प्रत्येक कट्टयामध्ये 44 नग पॉकेट व त्यावर ईगल हुक्का शिशा तंबाखु असे लिहिलेल्या प्रत्येक पॉकेटची किंमत 3,100/- रुपये असे एकुण 11, 45,760/- रुपये 4) 14 नग लहान पांढ­या रंगाचे प्लॅस्टीकच्या चुंगळीमध्ये प्रत्येक कट्ट्यामधे 44 नग पॉकेट व त्यावर ईगल हुक्का शिशा तंबाखु असे लिहीलेल्या प्रत्येक पॉकेटची किंमत 310 रुपये असे एकुण 1,90,960/- रुपये असा एकुण 33, 50, 480/- रु मुद्देमाल जप्त करुन सदर बाबत मा. अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन गडचिरोली यांना माहिती देण्यात आली तसेच पो.स्टे. देसाईगंज येथे अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन गडचिरोली यांचे फिर्यादी वरुन गुन्हा नोंद करण्यात आला
सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक निलोत्पल,अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे,अपर पोलिस अधीक्षक अहेरी यतीश देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर  यांचे मार्गदर्शनात पोस्टे देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक किरण रासकर यांचे नेतृत्वाखाली पोउपनि ज्ञानेश्वर धनगर, पोअं/दिनेश राऊत, नरेश कुमोटी, विलेश ढोके व संतोष सराटे यांनी पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!