गडचिरोली पोलिसांनी पकडला २५ लक्ष रु किंमतीचा दारुसाठा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

गडचिरोली- आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलिस अधीक्षक निलोत्पल  यांचे अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक 16/09/2023 रोजी गोपनिय बातमीदाराकडुन दहा चाकी वाहनातून मौजा आलापल्ली ते सिरोंचा रोडने अवैधरित्या देशी दारु वाहतूक करणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी  सुजितकुमार क्षिरसागर  उप पोस्टे जिमलगट्टा प्रभारी अधिकारी सपोनि संगमेश्र्वर बिरादार व पोलिस स्टाफ यांनी सापळा रचुन आरोपी नामे कैलास मडावी रा. लखनगुड्डा यास पकडुन त्याचे ताब्यातुन

1) अशोक लेलँड कंपनीची दहा चाकी माल वाहतुक वाहन क्र. एम. एच. 40 सी. डी. 3530 किंमत अंदाजे 15,00,000/- रु.





2) रॉकेट कंपनीची संत्रा देशी दारुचे 270 बॉक्स किंमत अंदाजे 10,00,000/- रु.



असा एकुण 25,00,000/- रु.  किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन सदर आरोपीवर उप पोस्टे जिमलगट्टा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, सदर गुन्ह्राचा पुढील तपास मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. संगमेश्वर बिराजदार हे करत आहेत.



सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक निलोत्पल ,अपर पोलिस अधीक्षक अहेरी यतीश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी जिमलगट्टा सुजीतकुमार क्षिरसागर यांचे नेतृत्वात जिमलगट्टा प्रभारी अधिकारी सपोनि. संगमेश्वर बिरादार, मपोउपनि. पुजा गव्हाणे, पोउपनि. ज्ञानेश्वर कोल्हे, आनंद गिरे व पोलिस अंमलदार यांनी पार पाडली.
तसेच यावेळी पोलिस अधीक्षक  नीलोत्पल यांनी जिल्ह्रातील नागरीकांना आवाहन केले की, जिल्ह्रात कुठेही अशा पद्धतीने होत असलेल्या अवैध दारु अथवा तत्सम अंमली पदार्थाच्या वाहतुकीबद्दल माहिती मिळताच गडचिरोली पोलिस दलाशी संपर्क साधावा.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!