
तलवारीने केक कापतांनाचा व बंदुक नाचवितांनाचा व्हिडीयो व्हायरल होताच गुन्हे शाखेने तिघांना घेतले ताब्यात…
सार्वजनिकरित्या वाढदिवस साजरा करतांना तलवारीने केक कापुन बंदूकीने फायर करुन जल्लोष साजरा करुन दहशत माजविनाऱ्या विरूध्द स्थानिक गुन्हे शाखेची भारतीय हत्यार कायद्यान्वये कार्यवाही, तिघांविरूध्द गुन्हा दाखल…
गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(17) सप्टेबर 2024 रोजी बातमीदाराकडून खात्रीलायक गोपनीय माहिती प्राप्त झाली की, काही दिवसापूर्वी काही समाजकंटक तलवारीद्वारे केक कापून तसेच हातात बंदूक घेऊन नाचण्याचा व वाढदिवसाचा जल्लोष साजरा केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित झाला असल्याचे सांगितल्याने सदरचे प्रसारित व्हिडिओ प्राप्त करून सदर बाबतची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक गोरख भामरे, यांनी सन उत्सव काळात अश्याप्रकारे सार्वजनिकरित्या जनमानसात जनतेमध्ये अवैध कृती करून दहशत माजविणाऱ्याविरूध्द कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते


त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थागुशा दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनाखाली प्रसारित व्हिडियोची शहानिशा करून सत्यता पडताळणी करण्यात आली असता,इसम 1) जितेन्द्र तेजलाल येडे वय 28 वर्षे, रा.घिवारी, ता. जि- गोंदिया यांनी त्याचे स्वतः चा वाढदिवस तलवारीने केक कापून, नाचून सार्वजनिकरित्या जल्लोष करीत असल्याचे तसेच दुसरा इसम 2) लोकेश झुंगरु खरे, वय 23 वर्ष, रा. किन्ही ता. जि. गोंदिया हा आपले हातात बंदूक घेऊन नाचून आनंद साजरा करत असल्याचे तसेच तिसरा ईसम 3) तेजलाल गोपीचंद येडे, वय-57 वर्षे, रा.धिवारी, ता.जि. गोंदिया हा त्याचे जवळील बंदुकीतून हवेत गोळीबार करुन जल्लोष करीत असल्याचे दिसून आल्याने सदर बाबत प्रतिष्ठित नागरिक यांचेकडून पडताळणी करण्यात येवून अवैध कृती केल्याचे निष्पन्न झाले

यावरून वरिष्ठांचे आदेशानुसार तिघांनाही दिनांक 17/09/2024 रोजी ताब्यात घेवुन जेरबंद करण्यात आले व प्रसारित व्हिडियो ची शहानिशा केली असता तिघांनीही वाढदिवसाचे दिवशी सार्वजनिकरीत्या हातात तलवार, बंदूक घेऊन नाचून वाढदिवसाचा जल्लोष साजरा केल्याचे कबूल केले आहे अवैधरीत्या हातात शस्त्रे बाळगून अवैध कृती करून जनमानसात जनतेमध्ये दहशत माजविल्याने तिघां विरूध्द पोलिस ठाणे रावणवाडी येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3, 4, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे सदर आरोपींना पोलिस ठाणे रावणवाडी पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई रावणवाडी पोलिस करीत आहेत यातील आरोपी क्र. 3) तेजलाल गोपीचंद येडे हे माजी सैनिक असून यांचेकडे मोठ्या (12 बोर बंदुकीचा ) परवाना आहे परंतु यांनी सन 2011 पासून सदर 12 बोर बंदुकीचा परवाना नूतनीकरण केले नसून याच बंदुकीतून मुलाचे वाढदिवसाच्या दरम्यान हवेत गोळीबार करून अवैध कृती केलेली आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधिक्षक. नित्यानंद झा, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्थागुशा दिनेश लबडे, पो उपनिरीक्षक शरद सैदाने, पोलिस अंमलदार राजु मिश्रा, महेश मेहर, भूवनलाल देशमुख, तुलशीदास लुटे, चित्तरंजन कोडापे, सोमेंद्र तुरकर, सुबोध बिसेन, छगन विठ्ठले, घनश्याम कुंभलवार, यांनी कारवाई केलेली आहे.


