जुगार अड्ड्यावर गोंदीया पोलिसांचा छापा,८ लोकांवर गुन्हा दाखल…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

गोंदीया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की मध्यप्रदेश व छत्तीसगढ राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलिस अधीक्षक  निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांनी जिल्ह्यांतील सर्व पोलिस ठाणे प्रभारी यांना सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता ऑपरेशन क्रॅकडाऊन मोहीम राबवून प्रभावी व परिणामकारक कारवाया करण्याच्या निर्देश व सूचना दिलेल्या होत्या

त्या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध धंदयाविरूद्ध धाड मोहीम राबवून प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. पोलीस ठाणे गंगाझरी येथील पोलिसांना दिनांक 14-11-2023 रोजी मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे त्यांनी 15.30 वा. च्या सुमारास *मौजा – मुंडीपार एमआयडीसी जवळील निम टेकडी, ता. जि. गोंदिया* येथे धाड कारवाई करून तासपत्यावर पैशांची हारजीत लावून जुगार खेळ खेळणाऱ्या 08 इसमांपैकी 05 इसमांना ताब्यात घेतले. जुगार खेळणाऱ्या इसमांच्या ताब्यातून रोख रक्कम 1,850/- रुपये, विविध कंपनीचे 03 मोबाईल हँडसेट व 03 मोटार सायकलस् *असा एकुण 1,71,880/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला* याबाबत पो. स्टे. गंगाझरी येथे 08 आरोपींविरोधात *अप. क्र. 452/2023 कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार कायदा* अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.





**ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे खालील प्रमाणे-*
1. अनुप रामप्रसाद मेंढे,वय 30 वर्ष, रा. मुंडीपार..



2. प्रवीण दिवाण बर्वे, वय 35 वर्ष, रा.सेजगाव खुर्द..



3. प्रतीक्षेप उर्फ विक्रम कुवरलाल गोंधरे वय 25 वर्ष, रा. सेजगाव खुर्द..

4. मुन्ना राजकुमार गोंधरे, वय 36 वर्ष,रा.सेजगाव खुर्द..

5. येवन रुदन वाढिवे, वय 43 वर्ष, रा. मुंडिपार*..
तसेच *घटनास्थळावरून पळून गेलेल्या आरोपींची नावे*–

*6. रवीकुमार तेजराम भगत, वय 45 वर्ष, रा. सेजगाव खुर्द..

7. पंकज कन्हैया कोहळे, वय 35 वर्ष, रा. मुंडिपार..

8. सनोज रामचंद्र बर्वे, वय 45 वर्ष, रा. सेजगांव खुर्द* अशी तासपत्यावर जुगार खेळणाऱ्याची नावे आहेत…

सदरची कामगिरी  वरिष्ठांच्या निर्देश सूचनाप्रमाणे आणि मार्गदर्शनाखाली पो. नि. महेश बनसोडे, पो. हवा. राकेश भुरे, पो. ना. महेंद्र कटरे, हरीश कटरे, पो.शि. श्रीकांत नागपुरे , प्रशांत गौतम यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!