तु माझ्या बहीनीचा नाद सोड,असे म्हनत मित्रानेच काढला मित्राचा काटा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गोंदिया- सवीस्तर व्रुत्त असे की यातील फिर्यादी – अजित सुनिल गजभिये वय 24 वर्षे राहणार कुडवां ता. जिल्हा गोंदिया यांनी पोलिस स्टेशन  रामनगर येथे तक्रार दिली की, *मृतक *प्रज्वल अनिल मेश्राम वय 20 वर्षे राहणार-* *आंबेडकर वार्ड, कुडवा* गोंदिया हा मावस भाऊ असून फिर्यादी, मृतक व यातील

आरोपी क्र.





1) संकेत अजय बोरकर* वय 20 वर्षे रा. कन्हार टोली, गोंदिया



2) आदर्श बाबूलाल भगत वय 21 वर्ष रा. कन्हारटोली, गोंदिया



हे एकमेकांचे मित्र आहेत  यातील मृतक.- प्रज्वल मेश्राम याचे संकेत बोरकर याचे बहिणीशी प्रेमसंबंध होते  ही गोष्ट संकेत यास मान्य नव्हती आणि याच कारणावरून संकेत याने  आंबेडकर चौक, गोंडीटोला रोड कुडवा* येथे दिनांक 27-11- 2023 रोजीचे रात्रो 02. 00 वाजता दरम्यान त्याचा दुसरा मित्र आदर्श भगत याचेसह फिर्यादीचे राहते घरी जाऊन यातील मृतक प्रज्वल मेश्राम यास घराबाहेर बोलावून त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आदर्श भगत याने यातील मृतकास पकडून ठेवले व आरोपी संकेत बोरकर याने त्याच्या ताब्यातील चाकूने मृतकावर वार करून जीवाने ठार मारून खून केला अशा तक्रारी वरून पोलिस ठाणे रामनगर येथे गुन्हा नोंद क्र. 362/2023 कलम 302, 34 भा.दं. वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता

सदर गुन्ह्यातील आरोपी संकेत अजय बोरकर वय 20 वर्षे रा. कन्हार टोली, गोंदिया* याचे पाठीवर पाच जखमा असून त्यास उपचाराकरिता जी.एम.सी नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे. तर त्याचाच सहकारी आदर्श  बाबूलाल भगत वय 21 वर्ष रा. कन्हारटोली, गोंदिया याचे पायावर घटनेमुळे दुखापत झाली असून त्याचेवर KTS रुग्णालय येथे उपचार करण्यात आले सदर आरोपी हा सध्या रामनगर पोलिसांच्या ताब्यात आहे. दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत  सदर गुन्ह्य घडल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच रामनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून अवघ्या एका तासात गुन्ह्यातील आरोपिंचा शोध घेवून ताब्यात घेवून गुन्ह्यांची उकल केली आहे…

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक  नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग तिरोडा अतिरिक्त कार्यभार गोंदिया  प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशन रामनगर चे प्रभारी सपोनि-बस्तवाडे,पोउपनि सोनवणे, श्रेणी पोउपनि- रहमतकर, पो हवा.भगत, राजेश भुरे, चव्हान, कपिल नागपुरे यांनी केलेली आहे. मा. वरिष्ठांनी तत्परतेने केलेल्या कामगिरीचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदर गुन्ह्यांचा तपास स.पो.नि बस्तवाडे, पो. स्टे. रामनगर हे करीत आहेत…





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!