नागपुरातून सराईत NDPS तस्कराला शिताफीने अटक; वर्धा पोलिसांची मोठी कारवाई

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

वर्धा / हिंगणघाट:

अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनाने एक मोठी कारवाई करत अमली पदार्थांच्या तस्करीत दीर्घकाळापासून फरार असलेल्या एका सराईत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. राजेंद्र उर्फ लड्डू राजाभाऊ निकराड (वय ४१ वर्षे, रा. महेश नगर, स्वामीनारायण मंदिराच्या पाठीमागे, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे.



नागपुरात रचला सापळा

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट आणि रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत दाखल NDPS ॲक्टच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी राजेंद्र उर्फ लड्डू निकराड हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत असताना, तो नागपूर शहरात लपून बसल्याची गुप्त माहिती वर्धा पोलिसांच्या पथकाला मिळाली. या बातमीच्या आधारे पथकाने नागपुरात अत्यंत कौशल्याने सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.

दाखल गुन्ह्यांचा तपशील

आरोपीवर वर्धा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये NDPS ॲक्टअंतर्गत पुढील गंभीर गुन्हे नोंद आहेत:



  • पोलीस स्टेशन हिंगणघाट

  • पोलीस स्टेशन हिंगणघाट 



  • पोलीस स्टेशन रामनगर

पोलीस पथकाची धडक कारवाई

ही कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक  सदाशिव वाघमारे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पार पडली.



तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (हिंगणघाट)  सुशीलकुमार नायक व हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक  अनिल राऊत यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पद्माकर मुंडे, पोलीस हवालदार सुनील मेंढे आणि पोलीस नाईक नरेंद्र आरेकर यांच्या पथकाने आरोपीला अटक करण्यात यश मिळवले.

पोलीस सध्या आरोपीची अधिक चौकशी करत असून त्याच्याकडून अमली पदार्थांच्या रॅकेटशी संबंधित आणखी महत्त्वाचे धागेदोर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!