जबरी चोरी करणारे हिंगोली पोलिसांनी केले जेरबंद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

जबरी चोरी करणा-या चोरट्यांना स्थागुशा पथकाने अवघ्या चार तासात ठोकल्या बेडया…..

हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक  जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयात मालाविरूध्दचे गुन्हयांना आळा घालण्याचे तसेच मालाविरूध्दचे गुन्हे उघड करण्याबाबत नेहमी सुचना देत असतात. त्याअनुषंगाने जिल्हयातील सर्व पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने गुन्हेगारांविरूध्द सतर्कपणे व परिणामकारक कार्यवाही करण्यात येते. दिनांक १२/०२/२०२४ रोजी दुपारी तिन वाजण्याचे सुमारास पो.स्टे. कळमनुरी हद्दीत शिवनी परिसरात अज्ञात दोन इसमांनी मोटार सायकलवर येवुन रस्त्यावरील इसमांना चाकुचा धाक
दाखवुन त्यांच्या जवळील रोख रक्कम जबरीने काढुन घेवुन नांदेडकडे पळाले अशी माहिती  फिर्यादी – शेख अवेश शेख मोहम्मद वय 27 वर्षे राहणार मस्तानशहा नगर हिंगोली यांचेकडुन मिळताच पो.नि. बोरसे, पो.स्टे. कळमनुरी व स्था. गु. शा. चे सपोनि. घेवारे याच्या दोन पथकामार्फत चोरटयांचा तात्काळ नाकाबंदी लावुन शोध सुरू केला असता चोरटे नांदेडकडे जातांना पाठलाग करून पकडण्यात आले. दोन्ही आरोपी नामे





1) जसवंत साईनाथसिंग रघुवंशी वय 25 धंदा बेकार राहणार कवठा नांदेड



2) केवल सिंह कल्याण सिंह भारद्वाज वय 22 धंदा बेकार राहणार मालेगाव तालुका अर्धापूर , जिल्हा नांदेड.



सदर चोरटयांना ताब्यात घेवुन फिर्यादी इसमांचे चोरलेले रक्कम १२००/- रूपये, गुन्हयात वापरलेला चाकु व मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त करून चोरटयास पो.स्टे. कळमनुरी येथे अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनि. पंढरीनाथ बोधनापोड हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही  जी. श्रीधर, पोलिस अधीक्षक, हिंगोली, अर्चना
पाटील, अपर पोलिस अधीक्षक, हिंगोली,  विकास पाटील, पो. नि. स्था. गु. शा. हिंगोली यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. श्री बोरसे, पो.स्टे. कळमनुरी, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि शिवसांब घेवारे, पोउपनि. कृष्णा सोनुळे, पोलिस अंमलदार देविदास सुर्यवंशी, माधव भडके, अरविंद राठोड, जाधव, राम शेळके, राजु ठाकुर, नितीन गोरे, आकाश टापरे, आझम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांचे पथकाने केली आहे. गुन्हा होताच अवघ्या काही तासामध्ये गुन्हेगारास अटक केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!