
चालत्या गाडीतून सुपारी चोरणारे नांदेड येथुन केले जेरबंद..
हिंगोली– सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 20/08/ 2023 रोजी रात्री आठ ते दहा वाजण्याचे सुमारास हिंगोली जिल्ह्यातील पोलिस स्टेशन बाळापुर अंतर्गत वारंगा फाटा भागामध्ये हैदराबाद दिल्ली जाणाऱ्या ट्रक मधून सुमारे दोन क्विंटल चाळीस किलो सुपारी किंमत अंदाजे 1,40,000 /- रुपयाची चालत्या ट्रक मधून सुपारीचे पोते चोरी गेल्यासंदर्भाने पोलीस स्टेशन बाळापुर येथे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचा तात्काळ छढा लावण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की सदर प्रकारची चोरी करणारे सराईत आरोपी हे नांदेड येथील असून त्यांची नावे
1) शेख मोईन शेख महमूद रा. नंदीग्राम हाऊसिंग सोसायटी मिल्लत नगर नांदेड.


2) शेख शाहरुख शेख अजगर रा.मलंग बाबा बिल्डिंग जवळ देगलूर नाका नांदेड

3) सोहेल खान राहणार कांदा मार्केट जवळ इतवारा नांदेड

4) इलियास खान उर्फ इल्लू राहणार खुदबे नगर चौरस्ता नांदेड असे असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपी पैकी शेख मोहशिन शेख महमूद यास शिवशक्ती नगर परिसर नांदेड येथून ताब्यात घेतले असून चोरीची सुपारी घेणारा आरोपी नामे शेख अल्ताफ शेख युनूस यास वसमत येथून ताब्यात घेऊन सुमारे 65 किलो चोरीची सुपारी जप्त करण्यात आली आहे. तसेच सदर गुन्ह्यात चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल व मोबाईल तसेच चोरलेली सुपारी असा एक लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस अटक करून पोलिस स्टेशन बाळापुर येथे हजर केले आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक जी श्रीधर , अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील , पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे स्थागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे , पोलिस अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर ,गणेश लेकुळे ,आकाश टापरे ,नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.


