दोन एटीएम फोडले पण हाती फक्त 1900 रु. लागले

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

दोन एटीएम फोडले पण हाती फक्त 1900 रु. लागले

पिंपरी – जुन्या सांगवी येथे एसबीआय बँकेचे दोन एटीएम चोरट्यांनी फोडले. मात्र, या दोन्ही एटीएम मधून चोरट्यांच्या हाती केवळ 1900 रुपये लागले. ही घटना शुक्रवार (दि.24) रोजी दुपारी साडेबारा वा.सु. जुन्या सांगवीतील महापालिकेच्या पाणी शुद्धीकरण केंद्रासमोरील राधानगर येथे घडली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





याप्रकरणी बलभीम संपत जाधव (वय-40 रा. जाधववाडी, चिखली) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. रोहित विजय बहादुर सिंग (वय-23 रा. मु.पो. मोहम्मदपुर, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) व त्याचा अल्पवयीन साथीदार यांच्यावर आयपीसी 380, 427, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने दोन एटीएम मशिनचे कॅश शटर तोडले. त्यानंतर आरोपींनी लोखंडी पट्टीच्या सहाय्याने मशीन मधील रोख रक्कम चोरली. परंतु दोन्ही एटीएम मशिनमध्ये मिळून चोरट्यांच्या हाती केवळ 1900 रुपये लागले. संशयितांनी एटीएमचे नुकसान करत रोख रक्कम चोरून नेल्या प्रकरणी बलभीम जाधव यांनी सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. आता पुढील तपास पोलीस करीत आहेत.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!