हुडकेश्वर पोलिसांची कारवाई: ९३० ग्रॅम गांजासह एकास अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


नागपूर:

हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी रंगेहात पकडत त्याच्याकडून ९३० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.



दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १०:१० वाजेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हुडकेश्वर पोलिसांनी बेसा पॉवर हाऊसच्या मागील बाजूस असलेल्या म्हाळगी नगर नाल्याजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये धाड टाकली. तेथे पोलिसांना एक इसम कापडी पिशवीसह आढळून आला.



त्याची विचारपूस केली असता, त्याने आपले नाव शेख शाहरूख शेख ईस्राईल (वय २५ वर्षे, रा. प्लॉट नं. ७५, म्हाळगी नगर, हुडकेश्वर, नागपूर) असे सांगितले. त्याच्याजवळील पिशवीची पाहणी केली असता, त्यात सुमारे ९,३०० रुपये किमतीचा ९३० ग्रॅम हिरव्या रंगाचा गांजा मिळून आला.



आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगून होता. याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. ॲक्ट (NDPS Act) च्या कलम  अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

कारवाई करणारे पोलीस पथक:

ही धडक कारवाई नागपूर शहराचे पोलीस आयुक्त मा. श्री. विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त मा. श्री. नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण प्रभाग) मा. श्री. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ४) मा. श्रीमती रश्मीता राव आणि सह. पोलीस आयुक्त (अजनी विभाग) मा. श्री. नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!