
मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश…
मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश…
नाशिक (शहर प्रतिनिधी) – नाशिक शहरामध्ये वारंवार वेगवेगळया परिसरातील रहीवाशी वस्ती, बाजारपेठांमधुन नागरिकांचे मोबाईल चोरी च्या घटना नेहमी घडत असल्याने सदर घटनांच्या अनुषंगाने आरोपीतांचा शोध व्हावा या दृष्टीने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, यांनी सुचना दिल्या होत्या. त्या अनुषगांने पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त (गुन्हे), संदिप मिटके यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते. या मध्ये पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथील आंतर राज्यिय टोळीचा पर्दाफाश करून २ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.०५जून) रोजी सकाळी ०७:०० वाजेच्या सुमारास राजपाल कॉलनी, पंचवटी येथील तेजश्री अपार्टमेंट मधील एकाच फ्लॅट मधुन ५ मोबाईल फोन चोरी झाले होते त्या बाबत पंचवटी पोलिस ठाणे येथे गु.र.नं. ३५५/२०२४ भा.द.वि. कलम ३८०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने नाशिक शहरात प्रतिबंधात्मक गस्त करीत असताना (दि.०६जुन) रोजी गुन्हेशाखा युनिट ०१ मधील पोउनि रविंद्र बागुल यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, आंध्रप्रदेश व तामीळनाडु येथील मोबाईल व लॅपटॉप चोरी करणारी टोळी नाशिक शहरात आली असुन सध्या ते देवळाली गाव परिसरात राहत असुन तीन इसम हे चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी सुभाष रोड, वाघचौक नाशिकरोड, येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली, सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट-१ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना देवुन त्यांनी सपोनि हेमंत तोडकर, पोउनि रविंद्र बागुल, पो. हवा. प्रविण वाघमारे, विशाल काठे, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, शरद सोनवणे, नाझीम पठाण, पो.ना विशाल देवरे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, समाधान पवार, यांचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून रवाना केले नमुद पथकाने सुभाष रोड, वाघ चौक नाशिक रोड, येथे सापळा लावुन मिळालेल्या बातमी प्रमाणे ०३ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडे विचारपुस करता त्यांनी त्यांची नावे १) इंद्रा डुमप्पा, रा. १-२३ बोडगुटपल्ली, कोटामंडल, जि.चित्तुर राज्य आंधप्रदेश, २) बालाजी सुब्रमणी, रा.५०२, उदया राजपालम, थोटामल जि.त्रिपथुर, राज्य – तामीळनाडु, ३) दुर्गेश कृष्णमुर्ती, रा.बोडीगुटटला पाले, व्यंकटगिरी कोटटा, जि.चित्तुर, राज्य आंध्रप्रदेश असे सांगुन त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. त्यावरून पंचवटी पोलिस ठाणे येथे गुरनं ३५५/२०२४ भादवि कलम ३८० प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आला असुन आरोपींकडुन विविध ठिकाणावरून चोरलेले २,३८,२००/-रूपये किंमतीचे एकुण २२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सदर इसमांना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामी पंचवटी पोलिस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपी पकडले गेल्या मुळे नाशिक शहरात होणा-या संभाव्य मोबाईल व लॅपटॉप चोरीस पोलिसांना प्रतिबंध करण्यात यश आले आहे.

सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त (गुन्हे), संदिप मिटके, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट १ येथील वरीष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि रविंद्र बागुल, पो.हवा. प्रविण वाघमारे, विशाल काठे, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, शरद सोनवणे, नाझीम पठाण, महेश साळुंके, पोना विशाल देवरे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, समाधान पवार यांनी संयुक्त रित्या केलेली आहे.



