पालघर येथुन पाच वर्षापासुन फरार असणार्या कुख्यात आरोपी प्रकाश उर्फ डॅान यास जळगाव पोलिसांनी शिताफिने केली अटक….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

जळगाव (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की पालघर येथे दरोडे टाकून पाच वर्षांपासून पोलिसांना चकमा देणाऱ्या दरोडेखोराला जळगाव येथे आयोजित वर्सी महोत्सवातून एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले.

प्रथमेश उर्फ डॉन प्रकाश ठमके (२४, रा.उल्हासनगर, जि. ठाणे)





असं या दरोडेखोराचे नाव असून ही कारवाई शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता करण्यात आली. प्रथमेश ठमके हा ठाणे व पालघर परिसरात मोठमोठे दरोडे टाकून फरार व्हायचा. त्याच्यावर दरोड्यासह इतर वेगवेगळे १६ गुन्हे दाखल आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ठाणे, पालघर पोलिसांसह राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे पोलिस त्याचा शोध घेत होते. प्रथमेशचे काही नातेवाईक जळगावात राहतात. त्यामुळे तो जळगावात आला असून सिंधी बांधवांच्या वर्सी महोत्सवात असल्याची गोपनीय माहिती जळगावील एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती
त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, रुपाली महाजन, जिल्हा विशेष शाखेचे सहायक फौजदार दिनेश बडगुजर, पोकॉ अमित मराठे,
पोलिस नाईक जुबेर तडवी हे वर्सी महोत्सवात पोहचले. त्या ठिकाणी पोलिसांना पाहून प्रथमेशने पळ काढला. त्या वेळी वरील पथकाने त्याचा अडीच किलोमीटर  पळत जाऊन पाठलाग केला व त्याला जिल्हा पेठ पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्याला जिल्हा सहायक पोलिस निरीक्षक रुपाली पोळ यांच्या ताब्यात दिले आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!