
फैजपुर सहा.पोलिस अधिक्षक यांचे पथकाचा अवैध गुटखा व्यापारी याचेवर छापा…
फैजपूर सहा.पोलिस अधिक्षक यांचे पथकाचा अवैध गुटखा विक्रेत्यांवर छापा…
फैजपुर(जळगाव) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फैजपूर पोलिस ठाण्याचे हद्दित न्हावी गावात एक इसम बेकायदेशीरपणे शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा पान मसाला सुरेश किराणा नावाचे दुकानातून विक्री करत असतो. अशी गुप्त बातमी सहाय्यक पोलिस अधीक्षक फैजपुर उपविभाग फैजपुर यांना मिळाली तरी सदर बातमी प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यासाठी पंचासह दि.(२७) रोजी रात्री ११.४५ वाजता न्हावी गावात जाऊन खात्री केली
असता सुरेश किराणा दुकानात इसम सुनिल अशोक माखीजा वय ४१ वर्षे रा. न्हावी ता.यावल हा अवैध रित्या त्याचे दुकानात विमल पान मसाला, केशर युक्त विमल पान मसाला, करमचंद प्रिमीयम पान मसाला, राजश्री पान मसाला, व्ही १ तंबाखू पाऊज, राजनिवास सुंगधी पान मसाला, केसी- १००० जाफराणी जर्दा, झेड एस-१ जाफराणी जर्दा, क्लॅक लेबल १८ पानमसाला असा विविध कंपनीचा पानमसाला, तंबाखू युक्त पान मसाला, जाफरानी जर्दा, असा विक्री करणेसाठी बाळगतांना आढळुन आला अशा एकुण
५९,८०६/- रु मालासह मिळून आला सदरचा माल सुनिल अशोक माखिजा वय ४१ वर्षे रा. न्हावी ता. यावल यांचे सुरेश किराणा दुकानात मिळून आल्याने त्याचे विरुध्द फैजपुर पोस्टे गुरन ४२ / २०२४ भादवी क.३२८,२७२,२७३,१८८ प्रमाणेचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जळगांव अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते जळगांव, सहा. पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह फैजपुर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी सुनिल पाटील,पोहवा गणेश मनुरे,दिलीप तायडे,नापोशि. अलताफ अली,सुमीत बावीस्कर यांनी केली




