पुणे शहर येथील दरोड्याचे आरोपीस जळगाव गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पुणे येथील दरोडयातील आरोपीस  स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी घेतले ताब्यात….

जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चतृः श्रृंगी पोलिस स्टेशन पुणे शहर येथील गंभीर गुन्ह्यातील आरोपी  हे कानळदा जि.जळगाव येथे असल्याची गोपनीय माहीती पोलिस शिपाई रविंद्र श्रावण कापडणे यांना मिळाली होती.सदरची माहिती त्यांनी वरीष्ठ पोलिस निरीक्षक स्थागुशा बबन आव्हाड यांना
कळविली लागलीच त्यांनी पोलिस उप निरीक्षक  गणेश वाघमारे, पोलिस अंमलदार महेश महाजन, हेमंत पाटील, रविंद्र कापडणे, राहुल कोळी सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांचे पथक तयार करून सदर आरोपींना ताब्यात घेवून त्याबाबत शहानिशा करून पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेत.





त्यावरुन  नमुद पथक हे खाजगी वाहनाने निघुन कानळदा गावात जावून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या  आधारे त्यांचा शोध घेतला असता तिथे कानळदा ते भोकर रोडवरील गावाचे बाहेर असलेल्या
निळया रंगाचे टपरीजवळ बसले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यावर सदर  पथकाने  अंतराअंतराने बातमीच्या दिशेने पायी जावून तिथे बसलेल्या तिन्ही इसमांना ताब्यात घेवून त्यांना अनुक्रमे त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) जितेंद्र उर्फ जितु प्रदिप वाघ, वय ३२, रा. वाघ नगर जळगाव, २) भुषण गोकुळ कोळी, वय २७, रा. समतानगर जळगाव, ३)चंद्रशेखर उर्फ चंदु रमेश देशमुख, वय ३३ रा.महाबळ जळगाव असे सांगीतल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांना पुणे येथील घटनेबाबत
विचारपुस केली असता त्यांनी चतृः श्रृंगी पोलिस स्टेशन पुणे शहर CCTNS NO ६४२ / २०२४ भा.न्या.सं.कलम ३१०(२),१४०(२), आर्म अॅक्ट ४/२५ या गुन्ह्याची कबुली दिली आहे.तशी माहीती पुणे पोलिसांना कळवुन त्यांना त्यांचे ताब्यात देण्यात आले आहे



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक, जळगाव, अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव संदीप गावित यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बबन आव्हाड स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेत्रुत्वात पोलिस उप निरीक्षक  गणेश वाघमारे, पोलिस अंमलदार महेश महाजन, हेमंत पाटील, रविंद्र कापडणे, राहुल कोळी सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी केली



करण्यात आली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!